
Basweshwar Jayanti 2025 Wishes In Marathi
बसवेश्वर जयंती ही १२व्या शतकातील महान संत, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक संत बसवेश्वर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाते. ही जयंती हिंदू पंचांगानुसार वैशाख शुद्ध तृतीयेला (एप्रिल किंवा मे महिन्यात) साजरी केली जाते.
बसवेश्वर यांचा जन्म इ.स. 1134 साली कर्नाटकातील बगवाड येथे झाला. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि मूर्तिपूजेविरुद्ध आवाज उठवला आणि कर्मयोग, समानता व नीतिमूल्यांचा प्रचार केला.
त्यांनी अनुभव मंटप नावाचे एक प्रकारचे लोकशाही व्यासपीठ तयार केले, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन चर्चा करीत. लिंगायत धर्माची स्थापना त्यांच्या विचारसरणीतून झाली.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. रथयात्रा, कीर्तन, प्रवचन, आणि बसव वचने पठणाचे कार्यक्रम घेतले जातात. अनेक ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश दिले आहेत, ते तुम्ही प्रियजनांना पाठवू शकता.
सत्य, अहिंसा आणि समानतेचा मार्ग दाखवणाऱ्या महान संत श्री बसवेश्वर यांना कोटी कोटी प्रणाम! बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
कर्म, भक्ती आणि ज्ञानाचा संगम म्हणजे बसवेश्वरांचे जीवन. त्यांच्या शिकवणीचा आदर्श ठेऊया.
बसवेश्वर जयंतीनिमित्त तुमचं जीवन शांतता, समता आणि सद्विचारांनी भरून जावो.
सर्वांना समानतेचा संदेश देणारे, कर्मयोगाचे महत्त्व सांगणारे संत बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन!
बसवेश्वरांची विचारधारा म्हणजे परिवर्तनाची दिशा. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊया.
"कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका" – या शिकवणीचा अंगीकार करूया.
धर्म, जात, पंथ यांच्या पलिकडे जाऊन मानवतेची शिकवण देणारे संत!
बसवेश्वरांचे वचने म्हणजे जीवन मार्गदर्शक दीपस्तंभ!
या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार करूया आणि समाजासाठी कार्य करूया.
समतेच्या प्रकाशाने प्रत्येक जीवन उजळून टाको – हीच बसवेश्वर जयंतीची खरी भावना.
बसवेश्वर जयंतीच्या पावन दिनी समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवूया!
संत बसवेश्वर यांचे विचार अमर राहोत!
बसवेश्वरांची शिकवण म्हणजे चिरंतन प्रेरणा!
समाजसुधारणेचा दिपस्तंभ – संत बसवेश्वर!
संत बसवेश्वरांची जयंती म्हणजे सत्य, समता आणि धर्मनिष्ठेचा उत्सव!
संत बसवेश्वरांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सदैव उजळून निघो!
धर्म, कर्म आणि सत्य हाच त्यांच्या शिकवणीचा गाभा!
बसवेश्वरांनी घडवलेली समतेची वाट अजूनही आपल्याला दिशा दाखवते.
त्यांच्या वचनांनी जीवन सुशोभित करूया. शुभ बसवेश्वर जयंती!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.