"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

Bangladesh Cricket Controversy: जहांआरा आलम हिने माजी निवड समिती सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
Bangladesh Cricket Controversy
Bangladesh Cricket ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

बांगलादेश महिला क्रिकेट सध्या मोठ्या वादात सापडले आहे. संघातील वेगवान गोलंदाज जहांआरा आलम हिने सध्याच्या कर्णधार निगार सुलतानावर ज्युनियर खेळाडूंवर अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर आता तिने माजी निवड समिती सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

जहांआराने सांगितले की २०२२ महिला एकदिवसीय विश्वचषकादरम्यान संघ व्यवस्थापनाकडून तिला अश्लील सल्ला देण्यात आला होता. तिने सांगितले की मंजुरुल इस्लामने तिच्याकडे अनेक वेळा अनुचित वर्तन केले आणि जेव्हा तिने त्याचा विरोध केला, तेव्हा तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळे निर्माण करण्यात आले.

Bangladesh Cricket Controversy
Naru in Goa: नागझर-कुर्टी वाठारांत सांपडलो 'नारू' जंतू; Watch Video

रियासत अझीम यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना जहांआराने सांगितले, “एकदा तो माझ्याकडे आला, माझा हात धरला, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या कानाजवळ झुकून विचारले, ‘तुझी मासिक पाळी किती दिवसांची असते?’ त्याला आधीच माहिती होती की माझी पाळी सुरू आहे, कारण फिजिओ ते आरोग्याच्या कारणास्तव नोंदवतात.

मात्र, निवडकर्त्याला ही माहिती का हवी होती हे मला समजले नाही. मी सांगितले, ‘पाच दिवस,’ तेव्हा तो म्हणाला, ‘ती काल संपायला हवी होती, संपल्यावर मला सांग मला माझ्या पाठीचीही काळजी घ्यावी लागेल.’ मी थक्क झाले आणि फक्त म्हणाले, ‘माफ करा, मला समजले नाही.’”

जहांआराने पुढे सांगितले, “आमच्या प्री-कॅम्प दरम्यान, मी गोलंदाजी करत असताना तो माझ्याकडे आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याला मुलींना मिठी मारण्याची, कानात बोलण्याची सवय होती. आम्ही त्याच्यापासून वाचण्यासाठी प्रयत्न करायचो. सामन्यानंतर हस्तांदोलन करतानाही आम्ही दूरूनच हात पुढे करायचो. आम्ही एकमेकांमध्ये विनोद करत म्हणायचो, ‘तो येतोय, आता पुन्हा मिठी मारेल.’”

Bangladesh Cricket Controversy
Goa Crime: 4 नाही 13 कोटींचा घोटाळा! गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरातपर्यंत पसरले जाळे; जालन्यातून एकाला अटक

जहांआराने सांगितले की तिने या प्रकरणात बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मदत मागितली, परंतु काहीही कारवाई झाली नाही. अखेरीस ती माध्यमांसमोर आली.

दरम्यान, क्रिकबझच्या अहवालानुसार, मंजुरुल इस्लाम यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत आणि ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. तथापि, बीसीबीने या गंभीर आरोपांची दखल घेतली असून तपासाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com