VIDEO: 'जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत शांतता नाही', बांगलादेशच्या निवृत्त जनरलनं पुन्हा ओकली गरळ
Anti India Statement: बांगलादेशचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी एक अत्यंत वादग्रस्त आणि भारतविरोधी वक्तव्य केले. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आणि सध्याचे पाक सैन्यप्रमुख असीम मुनीर यांच्याप्रमाणेच आझमी यांनाही भारताचे तुकडे-तुकडे होण्याचे स्वप्न पडत आहे.
'डेली टाइम्स ऑफ बांगलादेश'मध्ये छापलेल्या बातमीनुसार, ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी मंगळवारी (2 नोव्हेंबर) ढाका येथे एका चर्चासभेत बोलताना हे वक्तव्य केले. आझमी म्हणाले, "जोपर्यंत भारताचे (India) तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशला शांतता मिळणार नाही." विशेष म्हणजे हा बांगलादेशी जनरल यापूर्वीही पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन भारताविरुद्ध गरळ ओकत आला आहे.
बांगलादेशी जनरलच्या मनात भारताविरुद्ध विष
ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी हे बांगलादेशातील जमात-ए-इस्लामी पक्षाचे दिवंगत नेते गुलाम आझम यांचे पुत्र आहेत. त्यांनी मंगळवारी ढाका येथील एका चर्चासभेत भारताविरुद्ध गरळ ओकली. "भारताचे तुकडे-तुकडे झाल्याशिवाय बांगलादेशला पूर्ण शांतता मिळू शकत नाही," असे म्हणत त्यांनी भारत हा नेहमी बांगलादेशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, असा खोटा आरोप केला. राष्ट्रीय प्रेस क्लबमध्ये 'सर्वभौमत्व सुरक्षा परिषदे'द्वारे आयोजित या कार्यक्रमात आझमी यांनी चितगाव हिल ट्रॅक्ट्स मध्येही भारतच अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप केला.
शेख मुजीबुर रहमान आणि शेख हसीना यांच्यावर टीका
निवृत्त जनरल आझमी यांनी बांगलादेशचे (Bangladesh) संस्थापक शेख मुजीबुर रहमान आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरही जहरी टीका केली. आझमी म्हणाले, "शेख मुजीबुर रहमान यांच्या कार्यकाळात मनबेंद्र नारायण लारमा यांच्या नेतृत्वाखाली पर्वतीय चितगाव जनसंहती समितीची स्थापना झाली. त्यांची सशस्त्र शाखा 'शांती बाहिनी' होती. भारताने यांना आश्रय दिला, शस्त्रे पुरवली आणि प्रशिक्षण दिले. याचा परिणाम म्हणून 1975 ते 1996 पर्यंत डोंगराळ भागात रक्ताची होळी खेळली गेली."
निवृत्त ब्रिगेडियरने 1997 मध्ये शेख हसीना सरकारने स्वाक्षरी केलेल्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स शांतता कराराला 'तथाकथित' करार म्हणत त्याची निंदा केली. खगराचारी स्टेडियममध्ये 'शांती बाहिनी'ने शस्त्रे समर्पण करणे हा केवळ देखावा होता, असेही ते म्हणाले.
भारत-बांगलादेश संबंधांमुळे जनरल अस्वस्थ
निवृत्त जनरल आझमी यांना बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध अजिबात आवडत नाहीत. यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत आहे. भारताचे तुकडे होण्याचे स्वप्न आझमी यांना पडत आहे. हेच स्वप्न यापूर्वी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर आणि माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचेही होते, पण ते कधीच पूर्ण होऊ शकले नाही. आता बांगलादेशचा हा निवृत्त जनरल पाकिस्तानच्या इशार्यावर भारताविरुद्ध गरळ ओकत ओकत आहे.
दरम्यान, निवृत्त जनरल आझमी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले, जेव्हा बांगलादेशात भारतविरोधी भावना आधीच तीव्र आहेत आणि तिथे अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर हल्ले होण्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. आझमी यांचे हे वक्तव्य दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवणारे मानले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

