Congress Bharat Jodo: 'काँग्रेस', 'भारत जोडो' यात्रेला मोठा झटका; दोन्ही ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याचे आदेश

प्रसिद्ध कन्नड चित्रपट KGF-2 चे संगीत वापरल्याचा आरोप राहुल गांधींसह तीन काँग्रेस नेत्यांविरोधात करण्यात आला होता.
Congress Bharat Jodo Yatra
Congress Bharat Jodo YatraDainik Gomantak
Published on
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) मोठा झटका बसला आहे. कर्नाटक न्यायालयाने 'भारत जोडो यात्रा' आणि कर्नाटक काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरत्या काळासाठी ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. एमआरटी म्युझिकचे व्यवस्थापन पाहणारे एम नवीन कुमार यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने (Karnataka Court) हा निर्णय दिला आहे.

Congress Bharat Jodo Yatra
PM Mandhan Scheme: वयोवृद्ध शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार पेन्शन, असा घ्या योजनेचा लाभ

प्रसिद्ध कन्नड चित्रपट KGF-2 चे संगीत वापरल्याचा आरोप राहुल गांधींसह तीन काँग्रेस नेत्यांविरोधात करण्यात आला होता. याप्रकरणी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. संगीताचा वापर करून कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. बेंगळुरूमधील यशवंतपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भारत यात्रेचे दोन व्हिडिओ ट्विट केले होते, ज्यामध्ये KGF-2 ची लोकप्रिय गाणी परवानगीशिवाय वापरली गेली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा आतापर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा असा प्रवास करून, आता महाराष्ट्र दाखल झाली आहे. महाराष्ट्रात अनेक नेते काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'मध्ये सामील होऊ शकतात. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून, काँग्रेसचा प्रवासही याच भागातून जाणार असल्याने आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

Congress Bharat Jodo Yatra
Movies: 'या' आठवड्यात विविध 28 चित्रपटांची मेजवानी, 8 हिंदी चित्रपट; पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधी दोन सभांना संबोधित करणार आहेत. पहिला मेळावा नांदेड जिल्ह्यात 10 नोव्हेंबरला तर दुसरा मेळावा 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार आहे. ही यात्रा 14 दिवसांत राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यात्रेच्या कार्यक्रमानुसार नांदेड जिल्ह्यात चार दिवस पायी पदयात्रा होणार आहे. ही यात्रा 11 नोव्हेंबरला हिंगोली, 15 नोव्हेंबरला वाशिम, 16 नोव्हेंबरला अकोला आणि 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रात 382 किमी अंतर कापून 20 नोव्हेंबर रोजी यात्रा मध्य प्रदेशात प्रवेश करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com