Ban on RSS Shakha: केरळात मंदिरांमध्ये आरएसएसच्या शाखा भरवण्यास बंदी

मंदिरांच्या आवारात आरएसएस आणि ग्रुप ड्रिलच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
RSS in Kerala
RSS in KeralaDainik Gomantak

RSS: केरळच्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने कठोर परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार मंदिरांमध्ये किंवा मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. 

म्हणजेच मंदिरांच्या आवारात आरएसएसच्या शाखा भरवण्यास आता बंदी असेल. या आदेशाचे पालन करण्याच्या सक्त सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने नुकतेच सर्व मंदिरांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. मंदिरांच्या आवारात आरएसएस आणि ग्रुप ड्रिलच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे. यासोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

RSS in Kerala
Cough Cyrup : सततच्या तक्रारी! आता तपासणीनंतरच कफ सिरपची निर्यात

दोन महिन्यांपूर्वी हे परिपत्रक जारी करण्यात आले होते.
याआधी ३० मार्च रोजी मंडळाने मंदिर परिसराचा वापर मंदिरातील उपक्रम आणि मंदिरांमधील उत्सवांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी करू नये, असे परिपत्रक जारी केले होते. 

नव्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, मंदिर परिसराचा वापर संघ परिवार संघटनेकडून शस्त्र प्रशिक्षणासाठी केला जातो. हे थांबवण्यासाठी २०२१ मध्ये आदेश देण्यात आला होता, मात्र अधिकारी त्याचे पालन करत नाहीत. 

2016 मध्येही त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने एक परिपत्रक जारी करून मंदिरांमध्ये शस्त्र प्रशिक्षणावर बंदी घातली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर 2021 मध्ये अधिकारी त्याचे पालन करत नसल्याचे सांगण्यात आले. आता मंडळाने मंदिर परिसरातच अशा उपक्रमांवर बंदी घातली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com