Cough Cyrup : सततच्या तक्रारी! आता तपासणीनंतरच कफ सिरपची निर्यात

भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांकडून निर्यात केल्या जाणाऱ्या कफ सिरपवर जगभरातील संतापानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हे औषध परदेशात पाठवण्यापूर्वी त्याची चाचणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
Cough Syrup
Cough SyrupDainik Gomantak

Cough Cyrup: भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांकडून निर्यात केल्या जाणाऱ्या कफ सिरपवर जगभरातील संतापानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हे औषध परदेशात पाठवण्यापूर्वी त्याची चाचणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता कफ सिरप निर्यातदारांना त्यांची उत्पादने परदेशात पाठवण्यापूर्वी नियुक्त सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

१ जूनपासून नियम लागू

परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) नुकतीच एक अधिसूचना जारी केली. त्यात नमूद केले आहे की उत्पादनाच्या नमुन्याची प्रथम प्रयोगशाळेत चाचणी करावी लागेल. त्यानंतरच कफ सिरप निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. हे नवे नियम 1 जूनपासून लागू होणार आहे.

सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी

डीजीएफटीचे म्हणणे आहे की खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांची सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी अनिवार्यपणे केली जाईल. चाचणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. अनेक शहरांतील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा, कोलकाता येथील केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा आणि केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळेत नमुने तपासले जातील. याशिवाय राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या औषध चाचणी प्रयोगशाळांमध्येही नमुने तपासले जाऊ शकतात.

Cough Syrup
Voter List: 18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत आपोआप येणार नाव

अनेक बालकांच्या मृत्यूनंतर सरकार गंभीर

विशेष म्हणजे भारतात बनवलेल्या कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत जगभरात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. गेल्या वर्षी गांबिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनुक्रमे ६६ आणि १८ मुलांचा मृत्यू झाला होता. यासाठी भारतीय बनावटीचे कफ सिरप जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातून $17 अब्ज किमतीच्या कफ सिरपची निर्यात करण्यात आली होती आणि ही रक्कम 2022-23 मध्ये $17.6 अब्ज इतकी वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com