BSP MP Afzal Ansari Disqualified: कोर्टाच्या निर्णयानंतर 56 तासातच गेली खासदारकी; या मुस्लीम नेत्यावर कारवाई

न्यायालयाने सुनावली आहे 4 वर्षांची शिक्षा
afzal ansari
afzal ansariDainik Gomantak
Published on
Updated on

BSP MP Afzal Ansari Disqualified from Lok Sabha: उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

शनिवारी, त्यांना गाझीपूरच्या न्यायालयाने एका प्रकरणआत 4 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर 56 तासातच त्यांची खासदारकी गेली आहे.

अफझलचा भाऊ माफिया मुख्तार अन्सारी यालाही गँगस्टर प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने मुख्तारला 5 लाख रुपये आणि अफजलला 1 लाख रुपये दंड ठोठावला. मुख्तार आधीच बांदा कारागृहात बंद आहे. यापूर्वी खासदार अफजल जामिनावर बाहेर होते.

afzal ansari
Shashi Tharoor : 32,000 मुलींच्या धर्मांतराचा दावा सिद्ध करा अन् एक कोटी जिंका...शशी थरुरनी 'द केरला स्टोरी'ला दिलं आव्हान

कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर 2007 मध्ये अन्सारी बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राय यांच्या हत्येनंतर जाळपोळ झाली होती. व्यापारी नंद किशोर रुंगटा यांचे अपहरण आणि हत्याही झाली होती.

कृष्णानंद राय खून प्रकरणात न्यायालयाने अन्सारी बंधूंची निर्दोष मुक्तता केली. पण, गँगस्टर अॅक्टचे हे प्रकरण याच प्रकरणाशी संबंधित आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी दोन्ही भावांवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा निर्णय १५ एप्रिल रोजी येणार होता. मात्र, न्यायाधीश रजेवर गेल्याने सुनावणी पुढे ढकलली होती.

afzal ansari
Azam Khan Controversial Statement: 'मृतदेहाचा तुकडाही सापडला नाही...,' आझम खान यांचं राजीव गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य

अफझल अन्सारी म्हटले होते की, "आमच्यावर दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने आम्हाला निर्दोष सोडले आहे. अशा परिस्थितीत गँगस्टर खटल्याचा आधार घेऊन आमच्यावर कारवाई केली जात आहे. पण आमचा न्यायालयावर विश्वास आहे."

अफझल यांनी हत्येतून निर्दोष सुटल्याच्या आधारे उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.

2019 मध्ये अफजल अन्सारी यांनी गाझीपूरमधून बसपाकडून लढताना भाजपच्या मनोज सिन्हा यांचा 1 लाख 19 हजार 392 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com