रोमानियाची (Romania) राजधानी बुखारेस्ट येथून युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या 250 भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे दुसरे निर्वासन विमान रविवारी पहाटे दिल्ली विमानतळावरती सुखरुप उतरले आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muralitharan) यांनी युक्रेनमधून बुखारेस्ट (रोमानिया) मार्गे सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या भारतीय नागरिकांचे दिल्ली विमानतळावर स्वागत केले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्ली विमानतळावर आलेल्या भारतीय नागरिकांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या संपर्कात आहेत, आणि सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Indian students return safely from Ukraine)
या फ्लाइटने परतलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यार्थी घाबरले आहेत पण युक्रेनच्या इतर भागांपेक्षा आम्ही ज्या शहरात (रोमानियन सीमेजवळ) थांबलो होतो त्या शहरात परिस्थिती खूपच चांगली आहे. भारतीय विद्यार्थी आतिश नागर म्हणाले की, 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत, त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला सरकारकडून आशा आहे की ते त्यांना लवकर मायदेशी येथे आणतील.
एक निर्वासन विमान मुंबईत (Mumbai) उतरले आहे. यामध्ये युक्रेनमधून परतलेल्या एमबीबीएस विद्यार्थ्याने सांगितले की, थोडी भीती होती पण भारतात परत आल्याने खूप आनंद होत आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, मला भारत सरकारवर पुर्ण पणे र्विश्वास होता की ते नक्कीच आम्हाला आमच्या देशात परत आणतील.
युक्रेनमधून परतलेली आणखी एक विद्यार्थिनी आकांक्षा रावत म्हणाली की, "मला खरोखर भीती वाटली होती, पण भारत सरकारचे आभार, आम्ही घरी सुखरूप पोहोचलो. आम्ही प्रथम वाचलो. सरकारने काही दिवसांतच कारवाई केली आहे.
युक्रेनमधून परतलेल्या धारा व्होरा या विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला आमच्या देशाचा आणि भारत सरकारचा अभिमान वाटत आहे. आम्हाला आशा आहे की उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात परत आणले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.