'ही' 8 महत्त्वाची कामे 31 मार्चपर्यंत करा पूर्ण, अन्यथा भरावा लागेल दंड

ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते
itr kyc to pan aadhaar link 8 task should you complete by 31 march 2022
itr kyc to pan aadhaar link 8 task should you complete by 31 march 2022 Dainik Gomantak

मार्च 2022 अखेर काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत अनेक महत्त्वाची कामे आहेत, ज्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कोणती कामे निकाली काढायची आहेत ते जाणून घेऊया.

1- ITR फाइलिंग

2021-22 साठी उशीरा प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. आयकर नियमांनुसार, जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत ITR भरला नाही, तर तुम्हाला 3 वर्ष ते 5 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, जर तुम्ही आयटीआर दाखल केला असेल, तर तुमच्याकडे 31 मार्चपर्यंत त्यात सुधारणा करण्याची वेळ आहे.

2 पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. देय तारखेपर्यंत तुम्ही तुमचे पॅन कार्ड (PAN card) आधार कार्डशी लिंक केले नाही, तर तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच तुम्हाला 10 हजार रुपये दंडही भरावा लागू शकतो.

itr kyc to pan aadhaar link 8 task should you complete by 31 march 2022
नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाढणार कारच्या किमती

3- केवायसी अपडेट

Omicron च्या वाढत्या प्रभावामुळे, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक (RBI) खात्यांमध्ये KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. अशा ग्राहकांनी त्यांच्या खात्यात केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

4- वेळेपूर्वी गुंतवणूक करा

31 मार्च 2022 ही चालू आर्थिक वर्षाची शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कर बचतीची गुंतवणूक करायची असेल, तर नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी करा. ही संधी गमावल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, NPS सारख्या अनेक योजना आहेत ज्याद्वारे 1.50 रुपयांपर्यंतच्या कर बचतीचा दावा केला जाऊ शकतो.

5-बँक खाती पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांशी जोडणे

पोस्ट ऑफिस विभागाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांचे व्याजाचे पैसे 1 एप्रिलपासून थेट बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यात पाठवले जातील, असे म्हटले होते. म्हणजेच रोख रक्कम मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्येही गुंतवणूक करत असाल तर जवळच्या केंद्रावर जाऊन बँक (bank) खाते लिंक करा.

itr kyc to pan aadhaar link 8 task should you complete by 31 march 2022
'भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवा'

6- PM किसान KYC अपडेट

पीएम किसानच्या सर्व नोंदणीकृत लोकांनी ई-केवायसी (KYC) करणे आवश्यक झाले आहे. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. हे काम शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत न केल्यास पुढील हप्ता मिळणार नाही.

7- PPF आणि NPS सारख्या खात्यांमध्ये किमान पेमेंट

तुम्ही पीपीएफ आणि एनपीएस सारख्या खात्यांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही किमान गुंतवणूक केली आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास 31 मार्चपर्यंत करा कारण त्यानंतर तुम्हाला दंडासह पैसे भरावे लागतील.

8- डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठी केवायसी अपडेट

एप्रिल 2021 मध्ये सेबीने एक परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये NSDL आणि CDSL ला नाव, पत्ता, PAN, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि उत्पन्न श्रेणी यासारखी 6 महत्वाची माहिती द्यावी लागेल असे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com