VIDEO: मिचेल स्टार्कचा 'वन हँड' चमत्कार! स्वतःच्या गोलंदाजीवर डाईव्ह मारुन पकडला अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दुसऱ्या डावातही आपल्या 'स्पार्क'ने सर्वांना चकित केले.
Mitchell Starc Stunning Catch
Mitchell StarcDainik Gomantak
Published on
Updated on

Mitchell Starc Stunning Catch: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ स्टेडियमवर सुरु असलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसही गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 19 विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही रोमांच कायम होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या (England) 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने दुसऱ्या डावातही आपल्या 'स्पार्क'ने सर्वांना चकित केले. स्टार्कने इंग्लंडच्या दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात सलामीचा फलंदाज जॅक क्रॉलीचा एका हाताने अप्रतिम झेल घेत त्याला शून्यावर बाद केले.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Mitchell Starc Stunning Catch
AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

स्टार्कचा अविश्वसनीय झेल

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 132 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावाच्या आधारावर इंग्लंडला 40 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर इंग्लंडच्या डावाची सुरुवात झाली, तेव्हा सलामीवीरांकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, मात्र स्टार्कने त्यांना पहिल्याच षटकात जोरदार धक्का दिला.

स्टार्कने आपल्या दुसऱ्या डावातील पहिल्या षटकातील पाचवा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. क्रॉलीने या चेंडूवर सरळ शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगाने हवेत स्टार्कच्या दिशेने परतला. स्टार्कने क्षणाचाही विलंब न लावता डाव्या बाजूला डाईव्ह मारली आणि एका हाताने चेंडू अचूकपणे पकडला. स्टार्कने हा झेल पकडल्यानंतर जॅक क्रॉलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. एवढेच नव्हे, तर मैदानावरील इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही त्याच्या या अविश्वसनीय झेलमुळे आश्चर्याचा धक्का बसला.

Mitchell Starc Stunning Catch
Ashes 2023, ENG vs AUS: तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा रोमांचक विजय! कागांरूंना 3 विकेट्सने दिली मात

चमिंडा वासचा विक्रम मोडला

मिचेल स्टार्कची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. तो जगातील सर्वात धोकादायक डावखुरा वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. या झेलमुळे त्याने एका मोठ्या विक्रमात श्रीलंका क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चमिंडा वासला मागे सोडले. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून फलंदाजांना सर्वाधिक वेळा शून्यावर बाद करण्याच्या बाबतीत स्टार्कने चमिंडा वासला मागे टाकले.

चमिंडाने 68 वेळा फलंदाजाला शून्यावर बाद केले होते, तर मिचेल स्टार्कने आतापर्यंत 69 वेळा हा पराक्रम केला. या यादीत पाकिस्तानचा महान माजी गोलंदाज वसीम अक्रम हा 79 डक आऊटसह अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कच्या या शानदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने (Australia) सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com