भागलपूरमध्ये गोव्यातील नागरीकाला लुबाडण्याचा प्रयत्न; प्रतिकारानंतर गुंडांनी काढला पळ

स्थानिक बिहारी दुकानदार आले मदतीला धाऊन...
Attempt to rob Goan Citizen in Bihar
Attempt to rob Goan Citizen in BiharDainik Gomantak
Published on
Updated on

Attempt to rob Goan Citizen in Bihar: बिहारच्या भागलपूर येथे गोव्यातील एका नागरीकाला लुबाडण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. जोगसर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घंटाघर जवळ ही घटना घडली.

दुचाकीवरून आलेल्या दोघा गुंडांनी येथे आलेल्या गोव्यातील फ्रान्सिस नावाच्या नागरीकाला लुबाडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्या परिसरातील स्थानिक बिहारी लोक तत्काळ संबंधित गोवन व्यक्तीच्या बचावासाठी धाऊन गेले.

त्यामुळे दुचाकीवरून आलेल्या गुंडांचा प्रयत्न फसला. स्थानिकांच्या विरोधामुळे संशयित तेथून पसार झाले.

Attempt to rob Goan Citizen in Bihar
Ravi Kishan News: गोरखपूर ते गोवा थेट विमानसेवा सुरू करा; खासदार-अभिनेत्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

फ्रान्सिस हे रूग्णालयातून घंटाघर येथे जात होते. त्यांच्या हातात बॅग होती. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या हातातील बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न ते करू लागले. फ्रान्सिस यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्नही गुंडांनी केला.

फ्रान्सिस यांनी त्याला विरोध दर्शवत गुंडांवरच हल्ला चढवला. हा सगळा प्रकार आणि आरडाओरडा पाहून तेथील आजुबाजुचे दुकानदार, नागरीकही फ्रान्सिस यांच्या मदतीला धाऊन आले.

त्यांनीही गुंडांवर विरोध करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने जमा झाल्याचे पाहून दोघाही गुंडांनी दुचाकीवरून पळ काढला. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी आग्रह करूनही फ्रान्सिस यांनी या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिलेली नाही.

तथापि, त्यांनी गुंडांशी केलेल्या हातापाईची चर्चा येथे रंगली होती. हिंदी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com