Modi Govt 3 Years: उद्या शिमल्यात भाजपची मोठी रॅली, 15 दिवस चालवणार 'हा' कार्यक्रम

पुढील 15 दिवस भाजप जनसंपर्क अभियान राबवणार असल्याचे सांगितले जात आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

देशातील नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government)दुसऱ्या कार्यकाळाला आजच्या दिवशी 3 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून पुढील 15 दिवस भाजप जनसंपर्क अभियान राबवणार असल्याचे सांगितले जात आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करून सलग दुस-यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याची ही देखील पहिलीच वेळ होती. दणदणीत विजय मिळवून तीन वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 30 मे रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तर 2019 मध्ये त्यांनी शपथ घेतली. (Modi Govt 3 Years BJP big rally in Shimla tomorrow this program to run for 15 days)

PM Narendra Modi
भाजपने 8 राज्यांतील 16 उमेदवारांची केली घोषणा, निर्मला सीतारामन कर्नाटकमधून लढणार

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही सत्तेमध्ये आठ वर्षे पूर्ण केली आहेत. एनडीए सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने मोदी सरकारची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोठी योजना आखली आहे. यानिमित्ताने उद्या शिमल्याच्या रिज मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थिती लावणार आहेत. या समारंभाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या सिमल्यात होणार मेगा रॅली!

हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जय राम ठाकूर (Jai Ram Thakur) म्हणाले की, केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीसाठी शिमल्याची निवड केली हा हिमाचल प्रदेशसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. अक्षरशः सर्व जिल्हा मुख्यालये जोडली जाणार आहेत. हिमाचलसाठी ही एक मोठी संधी असणार आहे, ज्याचा फायदा राज्याला होईल. भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.

PM Narendra Modi
दिल्लीपासून चेन्नईपर्यंत पेट्रोल आणि डिझेल किती महागले? जाणून घ्या आजचे दर

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत

त्याआधी दुसऱ्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J. P Nadda) आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेतील. यावेळी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थिती लावणार आहेत. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मूळ मंत्रासह पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार गेल्या 8 वर्षांपासून काम करत असल्याचा दावा केंद्र सरकारमधील मंत्री करताना दिसून येत आहेत. 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 2014 पेक्षाही मोठा जनादेश मिळवण्यात यश आले आहे. एनडीए आघाडीला लोकसभेत 353 जागा मिळाल्या होत्या, तर त्यापैकी एकटा भाजप 303 जागांचा मानकरी राहिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com