UNSC च्या बैठकीत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी साधला चीन, पाकिस्तानवर निशाणा

दहशतवादी घटनांपासून आंतरराष्ट्रीय शांततेला होणाऱ्या धोक्यांबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) विशेष सत्राला संबोधित करताना दहशतवादाचा सामना करण्यासाठी आठ कलमी सूत्र सादर केले.
भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे.
भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: पाकिस्तान (Pakistan) समर्थक तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर कब्जा (Occupy Afghanistan) करून संपूर्ण जगाची शांतता धोक्यात आणली आहे. तेथील परिस्थिती प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी धोकादायक असल्याचे भारताने (India) म्हटले आहे. भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S. Jaishankar) यांनी गुरुवारी दहशतवादी घटनांपासून आंतरराष्ट्रीय शांततेला होणाऱ्या धोक्यांबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) विशेष सत्राला संबोधित करताना दहशतवादाचा सामना करण्यासाठी आठ कलमी सूत्र सादर केले. यामध्ये एक ना एक सबबी सांगून दहशतवादाचा गौरव करणे थांबवावे आणि दहशतवादाबाबत दुटप्पीपणाचा अवलंब न करण्याचे आवाहन करत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत संपूर्ण जगात दहशतवादाला प्रोत्साहन देणारे राष्ट्र म्हणून हे ओळखले जाते. असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे.
UNSC मध्ये अफगाणिस्तान प्रश्नावर भारताने स्पष्ट केली भूमिका

चीननेही खोडा घातला

जयशंकर यांनी चीनवरही (China) टीका केली, ज्याने दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर पाकिस्तानला मदत केली. दहशतवाद्यांवर बंदी घालण्याच्या बाबतीत चीन ज्या प्रकारचा दृष्टिकोन स्वीकारतो, ते जयशंकर यांनी संपूर्ण जगाच्या लक्षात आणून दिले आहे. भारताची UNSC च्या अध्यक्षपदी ऑगस्टसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री न्यूयॉर्कमध्ये आहेत. अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता दहशतवादावर गुरुवारच्या बैठकीचे महत्त्व देण्यात आले. जयशंकर यांच्या भाषणातून हे स्पष्ट झाले आहे की, नवीन परिस्थितीमध्ये भारताचा पाकिस्तानबाबतचा दृष्टीकोन आता पूर्वीपेक्षा अधिक कठोर होईल. दोन्ही देशांतील युद्धबंदीनंतर संबंधांमधील तणाव संपण्याची अपेक्षा होती. आता परिस्थिती बदललेली दिसते. जयशंकर यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नसेल, तरी त्यांचा रोख मात्र पाकिस्तानकडेच होता.

भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे.
अफगाणिस्तानातून सर्व भारतीयांना लवकरच परत आणू: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

इतर देशांनीही अफगाणिस्तानबद्दल केली चिंता व्यक्त

भारतावरील मुंबई, पठाणकोट, पुलवामा हल्ल्यांचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाच्या राक्षसासोबत कधीही तडजोड करणार नाही. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या सर्व दहशतवादी घटनांत पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दहशतवादी संघटनांची नावेच समोर आली नाहीत, तर त्यांचे पुरावे देखील सापडले आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशिवाय इतर अनेक देशांनीही या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. रशियाने सांगितले की ते अफगाणिस्तानातील राजकीय शक्तींना मदत करेल ज्यांचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही. अफगाणिस्तान हे दहशतवादाचे सुरक्षित आश्रयस्थान बनू नये याची काळजी घ्यावी लागेल, असा इशारा ब्रिटनने दिला आहे. चांगल्या आणि वाईट दहशतवादामध्ये भेद नसावा असेही चीनने म्हटले आहे. त्याचबरोबर चीनने कोणत्याही एका देशाला दहशतवादाला दोष देण्यास विरोध केला आहे.

भारताने दहशतवाद्यांना तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना (Terrorist organizations) प्रोत्साहन देणाऱ्या धोक्याकडे जागाचे लक्ष वेधले आहे.
इस्त्रायल दुतावास स्फोट: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इस्त्रायलच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा

जैश आणि लष्कर सारखे गट अजूनही भारताच्या विरोधात सक्रिय: परराष्ट्र मंत्री

जयशंकर यांनी ISIL चा विशेष उल्लेख केला आणि सांगितले की, या संघटनेचा काही भाग सीरिया आणि इराकमध्ये अजूनही जिवंत आहे. त्याचा आर्थिक विभाग नेहमीपेक्षा अधिक सक्रिय आहे. त्याला सातत्याने निधी मिळत आहे आणि आता तो बिटकॉईनद्वारे भरला जात आहे. ISIL-K भारताच्या जवळच्या भागात आपले पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा परिणाम जगासाठी मोठी चिंता आहे. हक्कानी नेटवर्कच्या कारवायांमुळे आमच्या चिंतेत भर पडली आहे. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटना अजूनही सक्रिय असून, त्या भारताच्या विरोधात त्यांचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे, कौन्सिलमध्ये कोणताही भेदभाव न करणारा किंवा असमाधानी असा निर्णय घेतला जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आम्ही पाठिंबा देण्यात येऊ नये, असा त्यांचा आग्रह आमचा आहे. यासोबतच जे याविषयी दुटप्पी बोलतात, त्यांना विरोध करण्याची हिंमत देखील बाळगायला हवी. असे स्पष्ट शब्दात जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com