Assembly Elections: 2024 पूर्वी 9 राज्यांमध्ये निवडणुका, विरोधकांना एकत्र करु शकतील का राहुल गांधी?

Political Battle In 9 States: 2023 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे. यावर्षी भारतातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

Political Battle In 9 States: 2023 हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे. यावर्षी भारतातील 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्षभर निवडणुकीची उत्सुकता पाहायला मिळणार आहे. मात्र, केंद्र सरकारने या वर्षीही जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकांची घोषणा केली, तर निवडणूक असलेल्या राज्यांची संख्या 10 होईल.

दरम्यान, या निवडणुकीत निकालाबरोबरच विरोधी एकजुटीचीही कसोटी लागणार आहे. 2024 पूर्वी अधिकाधिक विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर यायचे असेल, तर या विधानसभा निवडणुका हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे माध्यम ठरु शकते. हीच ती वेळ असेल जेव्हा विरोधी पक्ष जमिनीवर म्हणजेच जनतेमध्ये हा संदेश पोहोचवू शकतील की, 2024 साठी त्यांचा रोडमॅप काय असेल आणि कोणते पक्ष एकत्र असतील.

Rahul Gandhi
Gujrat Assembly Elections: गुजरात निवडणुकीतील PM मोदींच्या मॅरेथॉन रॅलींना आजपासून सुरुवात

जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार का?

कलम 370 हटवल्यानंतर आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) पहिल्या विधानसभा निवडणुकांची प्रतीक्षा आहे. येथेही जागांचे डिलिमिटेशन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर राज्यात लवकरच निवडणुका घेण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. अशा परिस्थितीत, या वर्षी येथे निवडणुका झाल्या तर 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होणारे हे 10 वे राज्य असेल.

2023 मध्ये 9 राज्यांमध्ये निवडणुका आहेत

2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांसह राज्ये पाहिली तर ती उत्तरेपासून दक्षिण आणि पूर्वेपर्यंत विस्तारलेली आहेत. वर्षाच्या सुरुवातीला 4 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर वर्षाच्या अखेरीस 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर-मध्य भारतातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याशिवाय ईशान्येतील मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराममध्ये निवडणुकीची पाटी बसवली जाणार आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणामध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Rahul Gandhi
Assembly Elections: गुजरात सरकारचा मोठा निर्णय, समान नागरी कायद्यासाठी समिती करणार स्थापन

कुठे कोणाचे सरकार?

या 9 राज्यांपैकी तीन राज्यात भाजपचे सरकार आहे. त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भाजप युती सरकारमध्ये आहे. याशिवाय काँग्रेस दोन राज्यात सत्तेत आहे आणि केसीआर यांचा पक्ष बीआरएस एका राज्यात सत्तेत आहे.

10 राज्यांमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी या विधानसभा निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात, कारण या राज्यांमध्ये लोकसभेच्या 119 जागा आहेत, ज्या एकूण जागांच्या 22 टक्के आहेत. त्यामुळेच या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल मानली जात आहेत.

Rahul Gandhi
Assembly Election 2022: 'ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसला गोव्यात कमकुवत केलं'

लोकसभेत कोणत्या पक्षाचे किती खासदार आहेत?

लोकसभेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सध्या लोकसभेत भाजपचे 303 खासदार आहेत, तर काँग्रेसचे 53, DMK 24, TMC 23 आणि YSR काँग्रेसचे 22 खासदार आहेत. याशिवाय शिवसेनेला 19, जेडीयू 16, बीजेडी 12 आणि बसपा 10 जागा आहेत.

याशिवाय, टीआरएसला 9, एलजेपीला 6 आणि राष्ट्रवादीकडे 5 जागा आहेत. एवढेच नाही तर असे पाच पक्ष आहेत ज्यांचे लोकसभेत 3-3 खासदार आहेत. त्याचबरोबर 3 अपक्ष खासदारांचाही यात समावेश आहे. लोकसभेत 2-2 जागा असलेले चार पक्ष आणि लोकसभेत 1-1 खासदार असलेले 15 पक्ष आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com