BJP: कुतुबमिनार, ताजमहल पाडून तिथे मंदीर बांधा; भाजपच्या 'या' खासदाराचे धक्कादायक वक्तव्य..

BJP: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते याच विधानसभेमधून निवडून आले होते.
BJP
BJP Dainik Gomantak
Published on
Updated on

BJP: राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदने( NCERT ) ने बारावीच्या इतिहासातील अभ्यासक्रमाबरोबरच इतरही वर्गाचा अभ्यासक्रमात बदल केला आहे. अभ्यासक्रमात बदल करताना काही धड्यांचा नव्याने समावेश केले आहे तर काही धडे पाठ्यक्रमधून काढले आहेत.

महत्वाचे म्हणजे, मुघल साम्राज्याविषय़ी असणारे धडे काढून टाकण्यात आले आहेत. यावरुन आता विवाद निर्माण झाला आहे.

अशातच आसाममधील भाजपाचे खासदार रुपज्योती कुर्मीने ताजमहाल आणि कुतुबमीनार ही स्मारके पाडण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह केला आहे.

मी पंतप्रधान मोदींना आग्रह करतो की कुतुबमीनार आणि ताजमहाल ही दोन स्मारके पाडून त्याजागी दोन मोठी सुंदर मंदीरे उभारण्यात यावीत. या मंदीराची वास्तूकला अशी व्हायला हवी की त्या दोन स्मारकांबरोबरची तुलना जगातली कोणतीही वास्तू किंवा मंदीर यांच्याबरोबर होऊ शकणार नाही.

  • दोन वर्षाचा पगार देईन

मंदीराविषय़ी पुढे बोलताना रुपज्योती कुर्माने म्हटले आहे की, जर मोदींनी कुतुबमीनार आणि ताजमहाल पाडून त्याजागी मंदीरे बांधण्याचा निर्णय घेतला तर मी कमीत कमी दीड वर्षाचा पगार मंदीराच्या बांधकामासाठी देऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

  • NCERT ने काय बदल केले आहेत

एनसीआरटीने आपल्या अभ्यासक्रमात बदल केले आहेत. हा बदल एनसीआरटी अभ्यासक्रम लागू असलेल्या शाळांना लागू होणार आहे.2023-24 पासून हा बदलेला अभ्यासक्रम लागू होणार आहे.

एनसीआरटीने विशेषरुपाने 12वीच्या अभ्यासक्रमातून मुघल साम्राज्याविषयी असलेले धडे इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत. याबरोबरच हिंदीच्या पुस्तकातून काही कविता , काही परिच्छेद देखील काढून टाकण्यात आले आहेत.

BJP
Vande Bharat New Route: रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्युज, आता 'या' तीन मार्गांवर धावणार वंदे भारत

दरम्यान, रुपज्योती कुर्मा 2021 मधून कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी ते कॉग्रेस पक्षात असताना मरियाना विधानसभेमध्ये निवडून आले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही ते याच विधानसभेमधून निवडून आले होते.

आता त्यांनी केलेल्या व्यक्तव्यानर पंतप्रधान नरेंद्र मोदी( Narendra Modi ) काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com