Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

Asia Cup 2025 India vs Pakistan: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला युजवेंद्र चहलला मागे टाकण्याची संधी असेल.
Hardik Pandya Record
Hardik Pandya RecordDainikGomantak
Published on
Updated on

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा हायव्होल्टेज सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ नंतर पहिल्यांदाच हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार असल्याने क्रिकेटप्रेमींच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. विशेषत: टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या या सामन्यात ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

हार्दिकने आत्तापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९४ विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर हार्दिकने आज पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, तर तो युजवेंद्र चहलला मागे टाकेल आणि दुसऱ्या क्रमांकावर झेपावेल. चहलच्या नावावर सध्या ९६ विकेट्स आहेत.

Hardik Pandya Record
Goa Highway Toll: गोव्याच्या हद्दीत लागणार टोल? पत्रादेवी येथे बांधकाम सुरू; महाराष्ट्रातूनही विरोधाची शक्यता

भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने ९९ विकेट्स घेतल्या असून, आजच्या सामन्यात त्याला संधी मिळाली तर तो शतक गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. दुसरीकडे जसप्रीत बुमराह ९० विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर असून आशिया कपमध्ये तो देखील १०० चा टप्पा ओलांडू शकतो.

टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • अर्शदीप सिंग – ९९

  • युजवेंद्र चहल – ९६

  • हार्दिक पंड्या – ९४

  • जसप्रीत बुमराह – ९०

Hardik Pandya Record
Elephant In Goa: बिथरलेला ‘ओंकार’ हत्ती गोव्यात दाखल! मोपाच्या जंगल भागात ठोकला मुक्काम; Watch Video

हार्दिक पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने ७ सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याची सरासरी १२ आहे आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे फक्त ८ धावांत ३ विकेट्स. गोलंदाजीसह फलंदाजीतही हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध ९१ धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com