Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! शुभमन, सिराजबाबत प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू

Asia Cup Indian Team Selection: आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता जवळ आलेली आहे. निवड समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्यतो समतोल राखत संघनिवड करणे ही समितीसमोर कसोटी असणार आहे.
Asia Cup Indian Team Selection
Asia Cup Indian Team SelectionDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया कप क्रिकेट स्पर्धा आता जवळ आलेली आहे. निवड समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्यतो समतोल राखत संघनिवड करणे ही समितीसमोर कसोटी असणार आहे. ही बैठक पुढील आठवड्याच्या सुरुवातीला, 19 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेटमधील अव्वल खेळाडू सप्टेंबर 9 ते 28 या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातील कोणालाही वगळणे कठीण ठरणार आहे.

आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानशी एकदा नव्हे तर तीनदा समोर येण्याची शक्यता असल्याने, संघ निवड फार काळजीपूर्वक करावी लागणार आहे. जुन्या नव्या खेळाडूंची फळी उभी करावी लागणार आहे.

गिल आणि सिराज यांनी अलीकडेच आव्हानात्मक परिस्थितीत चमकदार कामगिरी केली आहे. अँडरसन-तेंडुलकर मालिकेत गिलने तब्बल 754 धावा केल्या, तर इंग्लंडविरुद्ध सिराज सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.

तरीही, सध्या अभिषेक शर्मा व संजू सॅमसन ही सलामी जोडी, तसेच तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रिंकू सिंग आणि हार्दिक पंड्या यांच्या उपस्थितीत गिलला स्थान देणे सोपे नाही.

Asia Cup Indian Team Selection
Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

गिलने आयपीएलमध्ये 650 धावा करून अव्वल चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले. कोहलीच्या टी-20 निवृत्तीनंतर गिल टॉप-3 फलंदाजांमध्ये आला आहे. पण त्याला संघात घेतल्यास कोणाला बाहेर करायचे हा प्रश्न आहे.

Asia Cup Indian Team Selection
Asia Cup 2025 Schedule: प्रतीक्षा संपली! 'आशिया कप'चं वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान

सिराजने गेल्या वर्षभरात संघासाठी टी-20 सामने खेळले नसले तरी कसोटी मालिकेत प्रभावी खेळ केला. मात्र आयपीएल हंगामात त्याची कामगिरी सामान्य होती. दुसरीकडे, प्रसिध कृष्णाने 25 बळी घेत हंगाम गाजवला. बुमराह परतल्याने सिराजसह इतर वेगवान गोलंदाजांच्या निवडीवर समतोल साधणे निवडकर्त्यांसाठी आव्हान असेल. जैस्वाल व अय्यर यांना संघात घ्यायची इच्छा असली तरी उपलब्ध जागा मर्यादित असल्याने हे निर्णय कठीण ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com