
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा सुपर फोर सामना दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १७२ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं पाकिस्तानवर ६ विकेटनी विजय मिळवला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथन फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पॉवरप्लेच्या सहा षटकांत पाकिस्तानने ५५ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांना एक बळीही मिळाला नव्हता. मोहम्मद नवाझ आणि सॅम अयुब या दोघांनी प्रत्येकी २१-२१ धावा केल्या.
तर, फहीम अश्रफ याने नाबाद २० धावा जोडल्या. कॅप्टन सलमान आघा याने नॉट आऊट १७ धावा केल्या. फखर झमान १५ तर हुसनैन तलटने १० धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी नंतर पुनरागमन केलं आणि पाकिस्तानला १७१ धावांवर रोखलं होतं. भारताकडून गोलंदाजीत शिवम दुबे याने २ विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने २४ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि ३९ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात सहा चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचा जोडीदार गिल २८ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. गिलने त्याच्या डावात आठ चौकार मारले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात आपले खातेही उघडू शकला नाही, तीन चेंडूत एकही धाव न काढता बाद झाला. ओमानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सॅमसन या सामन्यात १७ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. शेवटी, हार्दिक आणि तिलक यांनी पुनरागमन करून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ३० आणि हार्दिक ७ धावांवर नाबाद राहिले.
पाकिस्तानचा संघ: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
भारताचा संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.