
Hardik Pandya Luxury Lifestyle: क्रिकेट जगतात सध्या आशिया कप 2025 ची जोरदार चर्चा सुरु आहे. 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण त्याआधी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे कारण असे की, त्याने घातलेले एक मौल्यवान घड्याळ. या घडाळ्याची इतकी किंमत आहे की, आशिया कपसाठी निवड झालेल्या पाकिस्तानच्या 17 खेळाडूंचा वर्षभराचा एकूण पगार एकत्र केला, तरीही हे घड्याळ खरेदी करता येणार नाही.
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) या महागड्या घड्याळ्याने तेव्हा सर्वांचे लक्ष वेधले, जेव्हा तो दुबईत सरावासाठी मैदानात उतरला. त्याचे हे घड्याळ पाहून अनेकांनी त्याच्या किंमतीबद्दल तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली. दरम्यान, क्रिकेटपटूंच्या लक्झरी लाइफस्टाइलचा हा एक भाग असला तरी या घडाळ्याची किंमत आणि त्याची तुलना पाहून सर्वच स्तब्ध झाले.
रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने घातलेले हे घड्याळ Richard Mille या जगप्रसिद्ध कंपनीचे RM 27-04 मॉडेल आहे. हे घड्याळ कला आणि अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. त्याच्या बांधणीसाठी वापरलेले विशेष साहित्य, त्याचे आकर्षक डिझाइन आणि मर्यादित प्रोडक्ट यामुळे ते अत्यंत दुर्मिळ मानले जाते. याच कारणांमुळे या घड्याळ्याची बाजारपेठेतील अंदाजित किंमत सुमारे 20 कोटी रुपये आहे. हे घड्याळ केवळ खेळाडूंच्याच नव्हे, तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या कलेक्शनचा एक भाग आहे. त्याच्या अविश्वसनीय किंमतीमुळेच ते सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
हार्दिकच्या या घडाळ्याची किंमत क्रिकेट जगतातील सर्वात आश्चर्यकारक बाबींपैकी एक आहे. एका बाजूला एक भारतीय क्रिकेटपटू एकटा 20 कोटींचे घड्याळ घालतो, तर दुसऱ्या बाजूला एक क्रिकेट खेळणारा देश आपल्या संपूर्ण संघाला वर्षभर एकत्रितपणे तेवढा पगारही देऊ शकत नाही. विशेष म्हणजे, ही आकडेवारी समोर आल्यानंतर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली. ही केवळ एका खेळाडूची गोष्ट नसून जागतिक क्रिकेटमधील व्यावसायिक मूल्यांमधील मोठी तफावत यातून दिसून येते.
मग आता हार्दिकच्या घडाळ्याची किंमत खरी आहे का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर होय असे आहे. आता सर्वात मोठा आणि रंजक प्रश्न हा आहे की, पाकिस्तानी खेळाडूंचा पगार नेमका किती आहे? आणि तो हार्दिकच्या एका घडाळ्यापेक्षा कमी का आहे? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) खेळाडूंच्या पगाराच्या ग्रेडिंगकडे लक्ष द्यावे लागेल. पाकिस्तानने आशिया कपसाठी 17 खेळाडूंचा जो संघ निवडला आहे, त्यांच्या पगाराचा हिशेब खालीलप्रमाणे आहे:
1. ग्रेड बी मधील 7 खेळाडू: पाकिस्तानच्या 17 खेळाडूंपैकी 7 खेळाडू ग्रेड बी मध्ये येतात. या यादीत अबरार अहमद, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, सॅम अयुब, सलमान आगा आणि शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक खेळाडूचा वार्षिक पगार भारतीय चलनात सुमारे 1 कोटी, 69 लाख, 2 हजार 540 रुपये आहे. या सात खेळाडूंचा मिळून एकूण वार्षिक पगार 11 कोटी, 83 लाख, 17 हजार, 780 रुपये होतो. विशेष म्हणजे यात संघातील काही महत्त्वाच्या खेळाडूंचाही समावेश आहे, जे संघाचे प्रतिनिधित्व करतात.
2. ग्रेड सी मधील 5 खेळाडू: या यादीत फहीम अश्रफ, हसन नवाज, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज आणि साहिबजादा फरहान यांचा समावेश आहे. ग्रेड सी मधील प्रत्येक खेळाडूचा वार्षिक पगार भारतीय चलनात सुमारे 93 लाख, 90 हजार, 300 रुपये आहे. या पाच खेळाडूंचा मिळून एकूण पगार 4 कोटी, 69 लाख, 51 हजार, 500 रुपये होतो. हे खेळाडू अनेकदा संघात येतात आणि जातात, पण त्यांचाही पगार हार्दिकच्या घडाळ्यापेक्षा कमी आहे.
3. ग्रेड डी मधील 5 खेळाडू: बाकीचे 5 खेळाडू ग्रेड डी मध्ये येतात. या खेळाडूंना वार्षिक 56 लाख, 34 हजार 180 रुपये भारतीय चलनात मिळतात. या पाच खेळाडूंचा मिळून एकूण पगार 2 कोटी, 81 लाख, 70 हजार, 900 रुपये होतो.
आशिया कपसाठी निवड झालेल्या पाकिस्तानच्या सर्व 17 खेळाडूंच्या वार्षिक पगाराची बेरीज केली असता, ती रक्कम भारतीय चलनात 19.34 कोटी रुपये होते. या आकड्याची तुलना हार्दिक पांड्याच्या 20 कोटी रुपयांच्या घडाळ्यासोबत केली असता हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचा एकत्रित पगारही हार्दिकच्या एका घडाळ्याच्या किमतीपेक्षा कमी आहे.
एकीकडे पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना निश्चित केलेला पगार देत आहे, तर दुसरीकडे भारतीय क्रिकेटपटू जाहिराती, आयपीएल आणि इतर गुंतवणुकीतून प्रचंड कमाई करत आहेत. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंसाठी 20 कोटी रुपयांचे घड्याळ हे त्याच्या एकूण कमाईचा एक छोटासा हिस्सा असू शकतो. या घटनेने पुन्हा एकदा क्रिकेट जगतातील आर्थिक विषमतेवर प्रकाश टाकला आहे, जिथे काही खेळाडू अब्जाधीश आहेत, तर काही अजूनही त्याच्या वार्षिक पगारावर अवलंबून आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.