
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा महामुकाबला रविवारी (२८ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये उत्सुकता आहे, कारण दोन्ही संघ स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. गट टप्पा आणि सुपर फोरमध्ये भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला असून आता हॅटट्रिक विजयाचा प्रयत्न करणार आहे. मात्र, जेतेपदाच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम फारसा चांगला नाही, त्यामुळे हा सामना रोमांचक होणार हे निश्चित आहे.
आशिया कप १९८४ पासून सुरू झाला असला तरी गेल्या ४१ वर्षांत भारत आणि पाकिस्तान कधीही अंतिम फेरीत आमनेसामने आले नव्हते. त्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे. पाकिस्तानने उपांत्य सामन्यात बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर भारताने सलग पाच सामने जिंकून अपराजित राहत अंतिम फेरी गाठली आहे.
भारताने या स्पर्धेत सर्वाधिक ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे, श्रीलंकेने ६ वेळा आणि पाकिस्तानने केवळ २ वेळा आशिया कप जिंकला आहे. २०१६ पासून आशिया कप टी२० स्वरूपातही खेळवला जातो, मात्र या वर्षी पुन्हा एकदा ५० षटकांच्या स्वरूपातच अंतिम फेरी रंगणार आहे.
यंदाच्या आशिया कपमधील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. गट आणि सुपर फोरमधील सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
एकूण सामने: १८
भारत विजय: १०
पाकिस्तान विजय: ६
निकाल नाही: २
इतिहास भारताच्या बाजूने आहे, परंतु अंतिम सामन्यात कोणत्याही संघाला हलक्यात घेणे सोप्प ठरणार नाही. भारत या स्पर्धेत वरचढ राहिलाय तसंच पाकिस्तान सोबत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतानं विजय मिळवला आहे.
दोन्ही संघांतील जेतेपदाचे सामने कायमच थरारक राहिलेत.
१९८५ (मेलबर्न, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा): भारताने पाकिस्तानला आठ विकेट्सने पराभूत केले.
१९८६ (ऑस्ट्रल आशिया कप): जावेद मियांदादच्या अखेरच्या षटकारामुळे पाकिस्तान एका विकेटने विजयी.
१९९१ (विल्स ट्रॉफी): आकिब जावेदच्या सात बळींमुळे पाकिस्तानने सहज विजय मिळवला.
१९९४ (ऑस्ट्रल कप, शारजाह): पाकिस्तानने ३९ धावांनी भारतावर मात केली.
१९९८ (सिल्व्हर ज्युबिली कप, ढाका): निर्णायक सामन्यात भारताने तीन विकेट्सने विजय मिळवला.
१९९९ (पेप्सी कप, बंगळुरू): पाकिस्तानने १२३ धावांनी विजय मिळवला.
१९९९ (कोका-कोला कप): पाकिस्तानचा आठ विकेट्सने दणदणीत विजय.
२००७ (टी२० विश्वचषक, जोहान्सबर्ग): धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाच धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
२००८ (किटप्लाय कप): पाकिस्तानने २५ धावांनी भारतावर मात केली.
२०१७ (आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, लंडन): पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवत भारतावर मोठा धक्का दिला.
रविवारी होणारा आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारतासाठी हॅटट्रिक विजयाची संधी तर पाकिस्तानसाठी प्रतिष्ठा व पुनरागमनाची संधी आहे. दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडू असून, कोणत्या संघाचा दिवस सरस ठरतो याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.