Manish Jadhav
आशिया कप 2025 चे काउंटडाउन सुरु झाले आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी यंदाचे सामने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळले जातील.
आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याच्या नावावर आहे. त्याने 25 सामन्यांत 1220 धावा केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने आतापर्यंत एकूण 1210 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 16 सामन्यांत 1171 धावा केल्या असून, टी-20 फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी 85 ची आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 1075 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 971 धावांसह या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
या टॉप 5 खेळाडूंच्या यादीत तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे, जे भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.
रोहित आणि विराटने एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये दमदार फलंदाजी करुन आपली क्षमता सिद्ध केली आहे.