Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या
Asia Cup Match Timing Changes
आशिया कप २०२६ ९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होईल आणि या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाईल आणि त्याचा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार होता, परंतु एका वृत्तानुसार, आता सामन्याची वेळ बदलली जाऊ शकते.
समोर आलेल्या माहितीनुसार, आशिया कप २०२५ चे सामने आता भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता (स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता) सुरू होतील. पूर्वी हे सामने संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार होते, परंतु संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील उष्ण हवामान लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ मध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. यावेळी लीग, सुपर ४ आणि अंतिम फेरीसह एकूण १९ सामने खेळवले जातील. यावेळी भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई यांना ग्रुप अ मध्ये स्थान देण्यात आले आहे तर ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप मॅच १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे खेळवण्यात येईल.
यावेळी प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर फोरमध्ये प्रत्येक संघ इतर तीन संघांशी एकदा सामना करेल. सुपर फोर टप्प्यातील दोन्ही संघ अंतिम सामना खेळतील.
अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा भिडू शकतात. जरी त्यांचा गट फेरीतील सामना १४ सप्टेंबर रोजी होणार असला तरी, जर ते दोघेही सुपर फोर टप्प्यात एकत्र आले तर ते २२ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भिडू शकतात.
वेळापत्रक
९ सप्टेंबर (मंगळवार): अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
१० सप्टेंबर (बुधवार): भारत विरुद्ध युएई
११ सप्टेंबर (गुरुवार): बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
१२ सप्टेंबर (शुक्रवार): पाकिस्तान विरुद्ध ओमान
१३ सप्टेंबर (शनिवार): बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१४ सप्टेंबर (रविवार): भारत विरुद्ध पाकिस्तान
१५ सप्टेंबर (सोमवार): श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
१६ सप्टेंबर (मंगळवार): बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
१७ सप्टेंबर (बुधवार): पाकिस्तान विरुद्ध युएई
१८ सप्टेंबर (गुरुवार): श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
१९ सप्टेंबर (शुक्रवार): भारत विरुद्ध ओमान
सुपर ४ सामन्यांचे वेळापत्रक
२० सप्टेंबर (शनिवार): गट ब पात्रता १ विरुद्ध गट ब पात्रता २
२१ सप्टेंबर (रविवार): गट अ पात्रता १ विरुद्ध गट अ पात्रता २
२२ सप्टेंबर (सोमवार): कोणताही सामना नाही
२३ सप्टेंबर (मंगळवार): गट अ पात्रता १ विरुद्ध गट ब पात्रता २
२४ सप्टेंबर (बुधवार): गट ब पात्रता १ विरुद्ध गट अ पात्रता २
२५ सप्टेंबर (गुरुवार): गट अ पात्रता २ विरुद्ध गट ब पात्रता २
२६ सप्टेंबर (शुक्रवार): गट अ पात्रता १ विरुद्ध गट ब पात्रता १
२७ सप्टेंबर (शनिवार): कोणताही सामना नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.