चन्नी 'बेईमान' आहे! केजरीवालांचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

केजरीवाल यांची टिप्पणी अशा वेळी आली जेव्हा ईडीने 'वाळू माफिया' विरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून चन्नीच्या नातेवाईकांच्या आणि इतरांच्या जागेवर छापे टाकले.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniDainik Gomantak
Published on
Updated on

पंजाबमधील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी सर्वच राजकीय पक्षांमध्ये शब्दयुद्ध वाढत चालले आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संचालनालयाने चरणजित सिंग चन्नी यांच्या पुतण्याच्या जागेवर छापा टाकला आहे. ईडीच्या या कारवाईबाबत केजरीवाल यांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधत त्यांना बेईमान म्हटले.

Charanjit Singh Channi
'ब्रह्म कुमारी स्वातंत्र्य अमृत महोत्सवाला' आज पंतप्रधान मोदी संबोधीत करणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 20 जानेवारी आणि 21 जानेवारीला पंजाबमध्ये असतील. मात्र या पंजाब दौऱ्यापूर्वी केजरीवाल यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना घेरले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे सामान्य माणूस नसून ते ‘बेईमान’ आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केला. केजरीवाल यांनी ट्विट केले की, "चन्नी हा सामान्य माणूस नाही, तो एक बेईमान माणूस आहे.

चन्नी यांच्या नातेवाईकांच्या जागेवर अंमलबजावणी संचालनालयाच्या छाप्यांवरून केजरीवाल यांनी काँग्रेस नेत्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. केजरीवाल यांची टिप्पणी अशा वेळी आली जेव्हा ईडीने 'वाळू माफिया' विरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीचा एक भाग म्हणून चन्नीच्या नातेवाईकांच्या आणि इतरांच्या जागेवर छापे टाकले.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पुतण्या आणि नातेवाईकावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यावरुन केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला आहे. हा बदला घेतला जात असल्याचे चन्नी म्हणाले आहेत. ते म्हणाले की, छापेमारीदरम्यान ईडीने म्हटले आहे की, पीएम मोदींच्या फिरोजपूर भेटीला विसरू नका. चन्नी पुढे म्हणाले की, ईडीच्या छाप्यात सूडाची भावना दिसून येते. मला अडकवण्यासाठी माझ्या पुतण्याची 24 तास चौकशी करण्यात आली. एजन्सीला माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही.

Charanjit Singh Channi
रिपब्लिक डे, इंडियन नेव्हीची अशी सुरुयं तयारी; पाहा व्हिडिओ

अंमलबजावणी संचालनालयाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, पंजाबमधील अवैध वाळू उत्खननाविरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिंगविरोधी चौकशीच्या संदर्भात टाकलेल्या छाप्यांमध्ये 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, त्यापैकी 8 कोटी रुपये चन्नी यांचा भाचा भूपिंदर याच्याकडून जप्त करण्यात आले.

संदीप कुमार नावाच्या व्यक्तीच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून 2 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, नवांशहर पोलिसांनी 2018 चा एफआयआर आणि राज्यातील बेकायदेशीर वाळू उत्खनन व्यवसायात गुंतलेल्या काही कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध पोलिसांना प्राप्त झालेल्या इतर तत्सम तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com