रिपब्लिक डे, इंडियन नेव्हीची अशी सुरुयं तयारी; पाहा व्हिडिओ

या वर्षी प्रजासत्ताक दिनी होणारी परेड अनेक प्रकारे वेगळी असेल कारण ती भारताचा वारसा, वाढती संरक्षण शक्ती आणि 'आत्मनिर्भरता' यांचा संगम असणार आहे.
 Indian Army
Indian ArmyDainik Gomantak
Published on
Updated on

देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. याच पाश्वभूमीवर या वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनावर देखील कोरोनाचं सावट असणार आहे. दरम्यान यावर्षी प्रजासत्ताक दिनाला होणारी परेड अनेक प्रकारे खास असणार आहे, कारण ती भारताचा वारसा, वाढती संरक्षण शक्ती आणि 'आत्मनिर्भरता' यांचा संगम दर्शवणार आहे. यापूर्वीही जाहीर केल्याप्रमाणे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा सोहळा सुरु होणार आहे. प्रजासत्ताक दिनाचा आठवडाभर चालणारा उत्सव 30 जानेवारी शहीद दिनापर्यंत सुरु राहणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या प्रारंभाच्या वेळेत आणि स्वरुपामध्ये इतर असंख्य बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाचे सैनिक तालीम करत आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकारांनी सोशल मीडियावर भारतीय जवानांच्या तयारीसंबंधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

 Indian Army
"मास्क घालणे आवडत नाही, पंतप्रधानांनाही ते आवश्यक वाटत नाही"

भारतीय नौदलाचे जवान प्रजासत्ताक दिनाच्या परेड सरावात भाग घेतात

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय नौदलाचे सैनिक विजय चौक, नवी दिल्लीमध्ये ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये संध्याकाळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी सहभागी झाले. ते यावेळी बॉलीवूडमधील गाण्यावर उत्साहीपणे थिरकतानाही दिसले.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, भारतीय नौदलाचे जवान नवी दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी बीटिंग रिट्रीट करताना दिसतात.

प्रजासत्ताक दिन 2022 परेड

पुढे, रिपब्लिक मीडिया नेटवर्कनुसार, परेड सुरु होण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. प्रथमच, वंचित लोकांसाठी विशेष आमंत्रणे आणली जातील जे सहसा 26 जानेवारीच्या परेडचे साक्षीदार होऊ शकत नाहीत. तथापि, कोरोना महामारीमुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मध्य आशियाई देशांतील कोणतेही परदेशी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार नाहीत. यापूर्वी, सरकारने पाच मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठवले होते, मात्र आता ही योजना रद्द करण्यात आली आहे.

शिवाय, परेडसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्वरुपात मोठा बदल करुन 480 नर्तक देशातील विविध नृत्यप्रकार सादर करणार आहेत. कार्यक्रम नेत्रदीपक बनवण्यासाठी विविध टप्प्यांत 3,800 हून अधिक सहभागींमधील स्पर्धेद्वारे या नर्तकांची निवड करण्यात आली आहे. हे परफॉर्मन्स पूर्वी वेगवेगळ्या शाळांच्या मुलांनी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com