West Bengal: 'हा पैसा पार्थचा आहे', अर्पिता मुखर्जीने दिली ईडीसमोर कबुली

West Bengal Minister Partha Chatterjee: पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जीने कबुली दिली आहे.
Arpita Mukherjee
Arpita MukherjeeDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Minister Partha Chatterjee: पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जीने कबुली दिली आहे. अर्पिताने आपल्या कबुलीजबाबत म्हटले की, 'माझ्या घरातून जप्त केलेली रोकड बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची आहे.' मंत्र्यांच्या निकटवर्तीयाने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) कबुली दिली आहे. हा पैसा संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवायचा होता, असेही अर्पिताने एजन्सीला सांगितले.

दरम्यान, ईडीने तपासादरम्यान सापडलेल्या संबंधित कागदपत्रांचा हवाला देत म्हटले की, 'अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंत्र्यांची संयुक्तपणे मालमत्ता आहे, जिथे रोकड सापडली. ही मालमत्ता पार्थ चॅटर्जी यांनी 2012 मध्ये खरेदी केली होती. कोलकाता (Kolkata) न्यायालयाने रविवारी मुखर्जी यांना एक दिवसाची ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली, जिथून मोठ्या प्रमाणात रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या गेल्या.'

Arpita Mukherjee
West Bengal: माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हत्येचा पाकिस्तानने रचला कट

अर्पिता मुखर्जी 12 शेल कंपन्या चालवत होती

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, 'पार्थ चॅटर्जी यांची अर्पिता मुखर्जी निकटवर्तीय आहे. विशेष म्हणजे अर्पिता 12 शेल कंपन्या चालवत होती, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.'

वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे असेही सांगितले की, 'शनिवारी संध्याकाळी मुखर्जी यांच्या जोका येथील फ्लॅटची झडती घेतली असता काही कागदपत्रे सापडली जी शेल कंपन्यांशी संबंधित होती.' मुखर्जी यांनी अनेक बंगाली आणि उडिया चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Arpita Mukherjee
West Bengal: ममता बॅनर्जी यांना न्यालयाचा झटका

चुकीचे काम करताना दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे : ममता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, 'कोणीही दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे.' शालेय सेवा आयोग (SSC) घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांचे कॅबिनेट सहकारी पार्थ चॅटर्जी यांना अटक केल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. बॅनर्जी यांनी आज राज्य सरकारच्या एका पुरस्कार सोहळ्याला संबोधित केले. यामध्ये त्यांनी त्यांच्याविरोधात सुरु केलेल्या "दुर्भावनापूर्ण मोहिमेबद्दल" विरोधकांवर टीका केली. आपण भ्रष्टाचाराचे समर्थन करत नसल्याचे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com