Rajpal Yadav मूर्ती लहान असली तरी किर्ती महान आहे

गोमन्तक डिजिटल टीम

राजपाल यादव बॉलिवूडमधील हे एकमेव व्यक्तिमत्त्व असे आहे ज्यांना पाहिले तरी आपला चेहरा खुलतो. राजपाल यांच्या विनोदांमध्ये एक वेगळी लकब आहे. 

एकमेव व्यक्तिमत्त्व

चुप चुप के मधील  बंड्या, हंगामामधील राजा अशा अनेक भूमिकांमध्ये आपण त्यांना पाहिले आहे. प्रत्येक भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोटभर हसवले आहे. 

प्रेक्षकांना पोटभर हसवले

भारतीय चित्रपट अभिनेता राजपाल यादव यांचा जन्म 16 मार्च 1971 रोजी लहान कुंद्रा, शहाजहानपूर, उत्तर प्रदेश येथे झाला.

उत्तर प्रदेश येथे जन्म

कुंद्रा येथून आठवी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर शाहजहानपूरमधून पदवी प्राप्त केली.

शिक्षण

लखनौ शहरातील भरतेंदू नाट्य अकादमीमधून बीएनएचे शिक्षण घेतले आणि दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण देखील घेतले आहे.

अभिनयाचे प्रशिक्षण

10 जून 2003 रोजी राजपाल  यांनी  राधा यादव यांच्याशी लग्न केले. त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनात त्यांना दोन मुली आहेत. 

राधा यादव यांच्याशी लग्न

राजपाल यादवच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. यात अनेक जुने, नवीन चित्रपटांचा समावेश आहे.

नावावर अनेक हिट चित्रपट
Goa | Dainik Gomantak