Indian Army: Martyr किंवा शहीद हा शब्द वापरणे चुकीचे, वापरा हे 6 शब्द

Indian Army: लष्कराने म्हटले की, Martyr किंवा शहीद हा शब्द वापरणे चुकीचे
Indian Army: Martyr किंवा शहीद हा शब्द वापरणे चुकीचे, वापरा हे 6 शब्द
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांसाठी शहीद हा शब्द अनेकदा वापरला जातो, मात्र हा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. याबाबत मुख्यालयाने लष्कराच्या सर्व कमांडोंना पाठवलेल्या पत्रात तसं म्हटले आहे. मुख्यालयाने 2 फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्रात 'शहीद शब्दाचा गैरवापर' असा विषय आहे. तसेच पत्रात म्हटले आहे की, सशस्त्र दलातील काही अधिकारी आणि प्रसारमाध्यमेही देशासाठी बलिदान दिलेल्या आपल्या सैनिकांसाठी Martyr किंवा शहीद हा शब्द वापरतात असे निदर्शनास आले आहे. (army advised its formations against the use of the word martyrs)

त्यात असे नमूद केले आहे की, Martyr किंवा शहीद हा शब्द अशा व्यक्तीला वापरला जातो ज्याचा मृत्यू शिक्षा भागताना झाला. ज्याने आपला धर्म सोडण्यास नकार दिला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक किंवा राजकीय हेतूने मारलं गेले आहे. त्यामुळे भारतीय लष्करातील (Indian Army) जवानांसाठी हा शब्द सातत्याने वापरणे योग्य नाही.

Indian Army: Martyr किंवा शहीद हा शब्द वापरणे चुकीचे, वापरा हे 6 शब्द
धक्कादायक! युट्यूब पाहून लॉजमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया; बी फार्मच्या विद्यार्थ्यांचे कृत्य

त्यामुळे लष्कराच्या मुख्यालयाच्या वतीने, लष्कराच्या सर्व कमांडोंना भाषणात किंवा कोठेही शूर सैनिकांचा उल्लेख करण्यासाठी Martyr किंवा शहीद या शब्दाचा वापर करू नये असे सांगण्यात आले असून Martyr किंवा शहीद याच्या ऐवजी 'किल्ड इन अॅक्शन' (कारवाई वेळी मारले गेले), 'लेड डाउन देयर लाइफ्स' (प्राणांची आहुती दिली), 'सुप्रीम सेक्रिफाइस फॉर नेशन' (राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान), 'फॉलन हिरोज' (शौर्य), 'इंडियन आर्मी ब्रेव्स' (भारतीय सेनेचे वीर), 'फॉलन सोल्जर्स' हे शब्द वापरण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Viral Video
Navratri 2026 wishes in Marathi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com