
arjun tendulkar engaged to sania chandhok
'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाला आहे. २५ वर्षीय अर्जुनचा साखरपुडा सानिया चांडोकशी झाला आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. अर्जुनची साखरपुडा अतिशय गुपचूप पार पडला. सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत.
साखरपुडा फारसा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अर्जुनची होणारी बायको मंगेतर सानिया एका मोठ्या कुटुंबातील आहे. सानियाचे कुटुंब मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे कुटुंब आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत.
गोलंदाजी अष्टपैलू अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच सामने खेळले आहेत. या दरम्यान, त्याने १३ धावा केल्या आहेत आणि तीन विकेट घेतल्या आहेत.
अर्जुनला आयपीएलमध्ये फक्त एकाच सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने ९ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. अर्जुनने २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तथापि, अर्जुन तेंडुलकरला आयपीएल २०२५ मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
अर्जुन नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो आणि खालच्या क्रमातही फलंदाजी करू शकतो. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी सामने, १८ लिस्ट ए सामने आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत.
डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५३२ धावा केल्या आहेत आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने लिस्ट ए मध्ये १०२ धावा आणि २५ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने ११९ धावा केल्या आहेत आणि २७ विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.