Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेत 3,000 अग्निवीरांना मिळणार देशसेवेची संधी

एअर चीफ मार्शल व्ही.आर चौधरी यांनी दिली माहिती
Indian Air Force Day
Indian Air Force DayDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय वायुसेना येत्या काही महिन्यात 3,000 अग्निवीरांना सामील करणार असल्याची माहिती एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिली. चंदीगड येथे 90 व्या भारतीय वायुसेना दिनाच्या समारंभात चौधरी बोलत होते. यावेळी त्यांनी नव- नवी शस्त्रात्रे, जवानांसाठी लढाऊ गणवेश यासह अनेक विषयांवर भाष्य केले.

(India govt to induct 3000 Agniveers in December says air chief marshal vr Chaudhari on Indian air force day )

Indian Air Force Day
Rahul Gandhi: राहुल गांधींनी कर्नाटकच्या शिक्षकांच्या व्यथा मांडल्या

यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की, "IAF अग्निपथ योजनेद्वारे डिसेंबरमध्ये प्रशिक्षणासाठी 3,000 'अग्नीवीर वायुदलात समाविष्ट करणार आहे. ही संख्या पुरेसा कर्मचारी वर्ग सुनिश्चित करण्यासाठी पुढील वर्षांमध्ये आणखी वाढणार असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. अग्नीवीरमूळे भारतातील तरुणांच्या क्षमतेचा उपयोग देशसेवेसाठी करून घेता येईल. या संधीचा फायदा देशातील युवकांनीही घ्यावा. तसेच देशातील कार्यक्षम युवतींसाठी लवकर वायुदल संधी उपलब्ध करुन देईल असे ही ते म्हणाले.

युवतींना संधी देण्याबाबत स्पष्टीकरण देताना आयएएफ प्रमुखांनी असेही नमूद केले की, भारतीय वायुसेने पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांना सामील करण्याची योजना आखली आहे. प्रत्येक अग्निवीर IAF करिअर सुरू करण्यासाठी योग्य कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज आहे. याची खात्री करण्यासाठी आम्ही आमची ऑपरेशनल ट्रेनिंग पद्धत बदलली आहे.

Indian Air Force Day
Nitish Kumar On PK: मी पीकेंना 'जेडीयू'चा उत्तराधिकारी होण्याची ऑफर दिली नाही!

नवी ऑपरेशनल ट्रेनिंग पद्धत युवकांना वायुदल अधिक सक्षम करण्यासाठी उपयोगात येईल. तसेच केंद्र सरकारने भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसाठी शस्त्र प्रणाली शाखा तयार करण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे उड्डाण प्रशिक्षणासाठी 3,400 कोटी रुपयांची बचत होईल. अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली.

सरकार जवानांसाठी लढाऊ गणवेश

यावेळी बोलताना चौधरी यांनी माहिती दिली की, सरकार जवानांसाठी लढाऊ गणवेशाचा एक नवीन पॅटर्न सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या याच्यावर तज्ज्ञांच्या मदतीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत काय करता येईल यावर संशोधन सुरु आहे. याला थोड्याच दिवसात पुर्णविराम मिळणार असून लढाऊ जवानांसाठी नवे गणवेश आपल्याला पहायला मिळतील असे ही ते यावेळी म्हणाले.

नव्या तंत्रज्ञानासह विविध क्षेपणास्त्रांना सामिल करण्यासाठी विचाराधीन

नव्या तंत्रज्ञानासह शस्त्रास्त्र प्रणालीमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रिमोटली पायलट केलेली विमाने आणि मल्टी-क्रू विमानांमध्ये शस्त्र प्रणाली ऑपरेटर्सच्या विशेष प्रवाहांना मानवेल, अशा आयुद्धांनाही सामिल करण्यासाठी विचाराधीन असल्याचं ही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमास एअर-ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न एअर कमांड, एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन हे आयएएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com