11 वर्षांची मुलगी झोलछाप डॉक्टरच्या वासनेची शिकार, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरही गोळीबार

UP Crime News: मुलीवर बलात्कार करून आरोपी शेहजाद फरार झाला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
An incident of rape of an 11-year-old minor girl has come to light in Noida Phase-1 of Delhi NCR.
An incident of rape of an 11-year-old minor girl has come to light in Noida Phase-1 of Delhi NCR.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

An incident of rape of an 11-year-old minor girl has come to light in Noida Phase-1 of Delhi NCR:

दिल्लीतील एनसीआरच्या नोएडा फेज-1मध्ये एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपी हा डॉक्टर असून तो, मुलीच्या घराच्या शेजारी दवाखाना चालवत होता.

हे भयंकर प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. अखेर पोलिसांनी चकमकीनंतर आरोपी डॉक्टरला अटक केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलीस उपायुक्त हरीश चंदर यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, शहजाद नावाचा डॉक्टर फेज-1 पोलिस स्टेशन हद्दीतील सेक्टर 8 मध्ये आपले क्लिनिक चालवायचा.

गुरुवारी शहजादने त्याच्या शेजारी राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीला फूस लावून क्लिनिकमध्ये नेले. तिला दवाखान्यात नेल्यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.

मात्र, या घटनेनंतर मुलीने तिच्या कुटुंबीयांना आपल्यासोबत काय प्रकार झाला आहे, याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

An incident of rape of an 11-year-old minor girl has come to light in Noida Phase-1 of Delhi NCR.
बिग बॉसचा विजेता एल्विश यादव अडचणीत, सापांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा...

12 तासात अटक

मुलीवर बलात्कार करून आरोपी शेहजाद फरार झाला होता. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती आणि चकमकीनंतर आरोपी शहजादला 12 तासांत अटक करण्यात आली.

An incident of rape of an 11-year-old minor girl has come to light in Noida Phase-1 of Delhi NCR.
‘तुम्ही मला माय लॉर्ड म्हणणे बंद करा, मी तुम्हाला अर्धा पगार देईन…’ SC मध्ये न्यायमूर्तींनी अशी का टिप्पणी केली?

अशी झाली चकमक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा त्यांना माहिती मिळाली की, आरोपी सेक्टर 10 च्या उद्यानात लपून बसला आहे. पोलिसांनी तातडीने तेथे छापा टाकला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर गोळीबार केला.

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला ज्यात आरोपी शेहजाद जखमी झाला. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त केली आहेत.

आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या मुलीची प्रकृती आता सामान्य असली तरी ती खूप घाबरलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.