Mizoram News: भारतातील अनेक राज्यांमध्ये मिरचीचे उत्पादन होते. दक्षिण भारतातील गुंटूर हे देशातील सर्वात मोठे मिरची बाजारपेठ म्हणून ओळखले जाते.
पण त्याच दरम्यान, सध्या मिझोराम या ईशान्येकडील राज्यातून 'बर्ड्स आय चिली' या मिरचीचा खास प्रकार अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे.
पहिल्यांदाच ही गरम मिरची अमेरिकेत निर्यात केली जात आहे. 'बर्ड्स आय चिली' चे मूळतः मेक्सिकोमध्ये उत्पादन होते. या मिरच्या लहान, सुमारे अर्धा इंच लांबीच्या असतात आणि त्यांची चव तिखट असते.
दरम्यान, शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य सरकारने प्रथमच स्थानिक पातळीवर पिकवलेल्या 'बर्ड्स आय मिरची'ची अमेरिकेत निर्यात केली आहे.
'बर्ड्स आय मिरची' ही मिझो सेंद्रिय मिरची आहे. राज्याचे कृषी मंत्री सी. लालरिन्सांगा यांनी मंगळवारी दक्षिण मिझोराममधील लुंगलेई जिल्ह्यातून 7.5 टन विशिष्ट मिझो मिरचीला हिरवा झेंडा दाखवून अमेरिकेला रवाना केले.
कृषी मंत्री सी. लालरिन्सांगा म्हणाले की, ही खेप आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे नेली जात आहे, तेथून ती अमेरिकेतील (America) नेवादा येथे पाठवली जाईल. याप्रसंगी बोलताना लालरिनसांगा यांनी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शेतकरी उत्पादक कंपन्यांचे (एफपीसी) अभिनंदन केले.
'बर्ड्स आय चिली' काही वेळा लोणच्याच्या जलापेनोपेक्षा जास्त तिखट लागते. मिरचीसाठी स्कोव्हिल हीट स्केलवर बर्ड्स आय मिरचीचे रेटिंग 100,000 ते 225,000 असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.