Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व 8 संघ जाहीर; सर्वात तगडा संघ कोणता?

Champions Trophy 2025 Teams: २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळालं आहे. पण ते हायब्रिड मॉडेलवर खेळवले जाईल, जिथे टीम इंडियाचे सर्व सामने यूएईमध्ये होतील.
Champions Trophy 2025
Champions Trophy 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Champions Trophy Teams

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळालं आहे. पण ते हायब्रिड मॉडेलवर खेळवले जाईल, जिथे टीम इंडियाचे सर्व सामने यूएईमध्ये होतील. पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळवले जातील.

आता सर्व संघांनी २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. या स्पर्धेसाठी, 8 संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे, प्रत्येक गटात चार संघ आहेत. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाईल.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ समाविष्ट आहेत.

Champions Trophy 2025
Goa Education: सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना निकालाविनाच पुढील इयत्तेत प्रवेश; मुख्याध्यापकांच्या बैठकीत चित्र स्पष्ट

अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच सहभागी

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद जिंकू शकले आहेत. बांगलादेश, इंग्लंडने अद्याप जेतेपद जिंकलेले नाही. तर, अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार आहे.

सर्व संघांची यादी

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

बांगलादेश : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, मोहम्मद महमुदुल्लाह, झाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हुसेन इमोन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा.

Champions Trophy 2025
Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिघांना 20 वर्षांची शिक्षा; बाल न्यायालयाचा निवाडा

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, रहमानउल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलीखिल, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नवीद झदरान.

पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी

इंग्लंड : जॉस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, अ‍ॅरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅडम झांपा.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जियोर्गी, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, अँरिक नोर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रास व्हॅन डर ड्यूसेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com