Corona च्या 'या' भयानक व्हेरिएंटची दहशत, रुग्णांच्या संख्येत होतेय झपाट्याने वाढ

Coronavirus Cases Today: देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य मंत्रालयाने आज आढावा घेतला.
Corona Patients Updates
Corona Patients UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

Coronavirus Cases Today: देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य मंत्रालयाने आज आढावा घेतला. व्हर्च्युअल बैठकीद्वारे देशभरातील लोक जोडले गेले, ज्यामध्ये सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांचा सहभाग होता.

आरोग्यमंत्र्यांनी सावध केले की, 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्या कमी होत आहेत.

यानंतर, 10 लाखांमागे 100 पेक्षा जास्त चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 10 आणि 11 एप्रिल रोजी देशातील सर्व रुग्णालये कोरोनाच्या तयारीसाठी मॉक ड्रिल करणार असल्याची माहिती आहे. याशिवाय, सर्व राज्यांना 8 आणि 9 तारखेला तयारीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

Corona Patients Updates
Coronavirus: देशातील 'या' 10 राज्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

कंटेनमेंट झोन म्हणजे काय

सर्व राज्यांना पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्यास आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कंटेनमेंट झोन ओळखण्यास सांगण्यात आले आहे.

जेव्हा एखाद्या परिसरात किंवा कॉलनीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळतो, तेव्हा 400 मीटरच्या क्षेत्राला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाते.

आज भारतात (India) कोरोनाचे 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून 13 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. हा या वर्षातील सर्वाधिक आणि गेल्या 6 महिन्यांतील सर्वाधिक डेटा आहे. विशेषतः सर्व राज्यांना दररोज कोरोना डेटा अपडेट करण्यास सांगितले आहे.

या व्हेरिएंटमुळे दहशत निर्माण झाली

17 मार्च रोजी देशात सरासरी 571 रुग्ण पॉझिटिव्ह येत होते, तर 7 एप्रिल रोजी दररोज सरासरी 4188 रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. या वेळी जगाची रोजची सरासरी 88,503 असली तरी. कोरोना ग्रस्त बहुतेक रुग्ण Covid च्या XBB.1.16 व्हेरिएंटला बळी पडत आहेत.

फेब्रुवारीमध्ये ते 21.6% लोकांना संक्रमित करत होते. आता मार्चपर्यंत ते 35.8% लोकांना आपला बळी बनवत आहे. आरोग्य मंत्रालयाने वृद्धांना प्रीकॉशनचा डोस घेण्याचा सल्ला दिला आहे.

Corona Patients Updates
Coronavirus Vaccine For Kids: 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनला मंजूरी

माहितीनुसार, केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये (Delhi) सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. येथील 10 किंवा अधिक जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट 10% पेक्षा जास्त आहे. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणामधील 5 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी रेट 5% पेक्षा जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com