Mumbai: खिलाडी अक्षय कुमारच्या मुलीकडे मागितले होते अश्लील फोटो, त्यानेच सांगितला प्रसंग; मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मोठी मागणी Video

akshay kumar daughter nitara cyber crime: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शुक्रवारी एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला.
akshay kumar daughter nitara cyber crime
akshay kumar daughter nitara cyber crimeDainik Gomantak
Published on
Updated on

akshay kumar daughter cyber crime incident

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शुक्रवारी एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या धोक्याबाबत बोलताना त्याने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्याची १३ वर्षीय मुलगी नितारा ऑनलाईन गेम खेळताना अशा घृणास्पद प्रकाराला सामोरी गेली होती. या अनुभवाचा उल्लेख करताना अक्षयने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा शिक्षण देण्याची मागणी केली.

अक्षय म्हणाला, “माझ्या घरात घडलेली एक छोटीशी पण गंभीर घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझी मुलगी नितारा व्हिडिओ गेम खेळत होती. काही गेम्स असे असतात जे तुम्ही अनोळखी लोकांसोबतही खेळू शकता. खेळताना तिला एका व्यक्तीकडून मेसेज आला ‘तू पुरुष आहेस की महिला?’ माझ्या मुलीने उत्तर दिलं, ‘मी महिला.’ त्यानंतर त्या व्यक्तीने अत्यंत घृणास्पद मेसेज पाठवला ‘तू मला तुझे नग्न फोटो पाठवू शकतेस का?’”

akshay kumar daughter nitara cyber crime
Goa: किती ‘एमएसएम’, स्टार्टअप बंद पडले याची माहिती जनतेला द्या! प्रतीक्षा खलप यांची मागणी; GST उत्सवावर केली टीका

या धक्कादायक प्रसंगानंतर निताराने तत्काळ गेम बंद केला आणि आईला सर्व काही सांगितले. याबद्दल बोलताना अक्षयने समाजासमोर गंभीर इशारा दिला. तो म्हणाला, “गोष्टी अशा प्रकारे सुरू होतात आणि नंतर मोठ्या गुन्ह्यांचे रूप घेतात. हा देखील सायबर गुन्ह्याचाच एक भाग आहे. आपण सर्व पालकांनी याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.”

मुख्यमंत्र्यांना केली 'ही' विनंती

अक्षय कुमारने महाराष्ट्र सरकारला थेट आवाहन केले. तो म्हणाला, “मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपल्या राज्यातील सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गात दर आठवड्याला ‘सायबर पिरियड’ हा विषय शिकवला जावा.

मुलांना या धोक्यांबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा गुन्हा रस्त्यावरील गुन्ह्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे आणि थांबवणे फार महत्वाचे आहे.”

akshay kumar daughter nitara cyber crime
Goa IIT Project: धारगळ, लोलये ते कोडार! ‘आयआयटी’ला राज्यात 10 ठिकाणी नकारघंटा; सरकारसमोर पेच

सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ प्रौढच नव्हे तर लहान मुलेही त्याचे बळी ठरत आहेत. ऑनलाईन गेम्स, सोशल मीडिया, चॅट अॅप्स याद्वारे मुलांपर्यंत गुन्हेगार सहज पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वांनी सर्तक राहणं गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com