युक्रेन (Ukraine) आणि रशियामधील (Russia) युद्ध दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे, आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी तर अण्वस्त्रे तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Russia Ukraine Crisis)
अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने लोक युक्रेनमधून स्थलांतर करून शेजारील देशांमध्ये आश्रय घेताहेत. त्याचबरोबर भारत सरकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी देखील मोहीम राबवत आहे.
कीवमधून आतापर्यंत 1100 हून अधिक भारतीय सुखरूप मायदेशात परतले आहेत. मात्र, तरीही मोठ्या संख्येने नागरिक तेथे अडकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणणारे एअर इंडियाचे (Air India) पाचवे विमान आज दिल्ली विमानतळावरती उतरले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि इतर भारतीय नागरिकांना बुखारेस्ट (Romania) मार्गे भारतात घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमान (AI 1942) सोमवारी सकाळी 6:30 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.