Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Air India Flight Emergency Landing Jaipur: फ्रँकफर्टहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI-2030' विमानाचे जयपूर विमानतळावर अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
Air India Flight Emergency Landing Jaipur
Air India Flight Hijack AlertDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Air India Flight Hijack Alert: फ्रँकफर्टहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI-2030' विमानाचे जयपूर विमानतळावर अचानक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. उड्डाणादरम्यान विमानामध्ये हायजॅक अलर्ट जनरेट झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला काही सेकंदांसाठी 'स्कॉवक-7500' चा सिग्नल मिळाला.

या सिग्नलमुळे सुरक्षा यंत्रणांची पळापळ झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान जयपूरकडे वळवण्यात आले. सकाळी पावणेदहाच्या सुमारास हे विमान जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असून त्याला लगेचच आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले. विमानाच्या पायलटने हा कोड काही सेकंदांसाठी ब्रॉडकास्ट केल्याचे सांगण्यात येत आहे.

Air India Flight Emergency Landing Jaipur
Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

विमानचालन क्षेत्रात 'स्कॉवक-7500' या आंतरराष्ट्रीय ट्रान्सपॉन्डर कोडचा वापर विमान हायजॅक झाल्याचे किंवा विमानाचा जबरदस्तीने ताबा घेण्यात आल्याचे सूचित करण्यासाठी केला जातो. हा कोड एटीसी प्रणालीवर विमानाची ओळख दर्शवतो. अशा आणीबाणीच्या प्रसंगी विमान मुख्य टर्मिनलपासून दूर आयसोलेशन बेमध्ये पार्क केले जाते, जेणेकरुन इतर विमानांना कोणताही धोका न पोहोचता सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण विमानाची तपासणी करता येते. सध्या या अलर्टबाबत अधिकृत माहितीची वाट पाहिली जात आहे.

Air India Flight Emergency Landing Jaipur
Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

दुसरीकडे, सौदी अरेबियातील बिघडत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने रियाधसाठीची आपली उड्डाणे रद्द करण्याचा कालावधी वाढवला आहे. एअर इंडियाने 15 ऑक्टोबरपर्यंत तर एअर इंडिया एक्स्प्रेसने 14 ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. दोन्ही विमान कंपन्या मध्य पूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रभावित प्रवाशांना तिकिटांचा फूल रिफंड दिला जात असून, प्रवाशांच्या सोयीसाठी मोफत रिड्यूलिंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com