Air India ने नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांची केली घोषणा

दुसरीकडे एअर इंडियाने (Air India) सार्वजिनक वाहतूकीसाठी मालदिव (Maldive) आणि मलेशिया (Malaysia) या देशांदरम्यान नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे.
Air India
Air India Dainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच जगातील अनेक देशांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीस मज्जाव करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे एअर इंडियाने (Air India) सार्वजिनक वाहतूकीसाठी मालदिव (Maldive) आणि मलेशिया (Malaysia) या देशांदरम्यान नवी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. मलेशियासाठी असणाऱ्या प्लाइट्सचे नियंत्रण एअर इंडियाच्या स्वामित्वाखालील एअरलाईन्स एअर इंडिया एक्सप्रेस संचलित करणार आहे. त्याचबरोबर एअर इंडिया वंदे मातरम अभियानातर्गंत 28 जुलाई 2021 पासून मालदिवसाठी इंटरनॅशनल प्लाइट्स त्याचे नियंत्रण करणार आहे.

मुंबई आणि दिल्लीतून उड्डाणे

एअर इंडिया एक्सप्रेस च्या प्लाइट्स मुंबई ते माले साठी नॉनस्टॉप तसेच दिल्ली ते मुंबई व्हाया माले अशा असणार आहेत. ही उड्डाणे केवळ बुधवार आणि शनिवार या दोन दिवसांसाठी असतील. त्याचबरोबर एअर इंडिया आजपासून अर्थात गुरुवार ते सोमवार बंगळूरु ते तिरुअनंतपुरम व्हाया माले अशी प्लाईट्स असणार आहे. तसेच एअर इंडिया एक्सप्रेस ऑगस्ट 2021 पासून भारत ते क्वालालंपूर दरम्यान आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु करणार आहे. यासंबंधीची घोषणाही करण्यात आली आहे.

Air India
Air India: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी महत्वाची बातमी

आंतरराष्ट्रीय प्लाट्ससाठी तिकीट किती

मुंबई ते माले दरम्यान इकॉनॉमीक क्लाससाठी एअर तिकिट 16,953 रुपये एवढे असणार आहे. तर बिजनेस क्लास साठी एअर तिकिट 53,334 रुपये असणार आहे. त्याशिवाय मलेशियासाठी अंतरराष्ट्रीय प्लाइट्स हैदराबाद ते क्वालांलपूर दरम्यान एअर तिकिटाची सुरुवातीची किंमत 23,243 रुपये एवढी असणार आहे. या उड्डाणांची सुरुवात ऑगस्ट 2021 पासून होणार आहे. दरम्यान कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने मे 2020 पासून वंदे मातरम अभियानातर्गंत स्पेशल आंतरराष्ट्रीय प्लाइट्ससाठी परवानगी दिली आहे. नंतर जुलै 2020 पासून एअर बबल व्यवस्थेतर्गंत काही महत्त्वाच्या देशांकरिता प्लाइट्साठी मंजूरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com