Indian Air Force Recruitment 2021: एअर फोर्समध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज

भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) ग्रुप सी सिव्हिलियन पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
Indian Air Force Recruitment 2021
Indian Air Force Recruitment 2021Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय हवाई दलाने ग्रुप सी सिव्हिलियन (Group C Civilian) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, नागरी श्रेणी अधीक्षक, निम्न विभाग लिपिक, स्टोअर कीपर, कुक, पेंटर यांच्या 282 रिक्त पदांची भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. (Air Force job opportunity for 10th and 12th pass)

भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) जारी केलेल्या या रिक्त पदासाठी (Indian Air Force Recruitment 2021) अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 7 सप्टेंबर 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, कृपया अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध सूचना तपासा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास फॉर्म नाकारला जाईल, त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या.

Indian Air Force Recruitment 2021
Video: ममता बॅनर्जींनी आदिवासी नृत्यावर धरला ताल

रिक्त पदांची माहिती

  • ग्रुप सी सिव्हिलियनसाठी - 282 पदे

  • मुख्यालय देखभाल कमांडसाठी - 153 पदे

  • मुख्यालय ईस्टर्न एअर कमांडसाठी - 32 पदे

  • मुख्यालय दक्षिण पश्चिम हवाई कमांड -11 पद

  • स्वतंत्र युनिट्ससाठी - 1 पद

  • कुकसाठी (साधारण ग्रेड) - 5 पदे

  • मेस स्टाफसाठी - 9 पदे

  • मल्टी टास्किंग स्टाफ साठी - 18 पदे

  • हाऊस कीपिंग स्टाफसाठी - 15 पदे

  • हिंदी टंकलेखक साठी - 3 पदे

  • लोअर डिव्हिजन क्लर्क साठी - 10 पदे

  • स्टोअर कीपर साठी - 3 पदे

  • कारपेंटर साठी - 3 पदे

  • पेंटर साठी - 1 पद

  • अधीक्षक (स्टोअर) साठी - 5 पदे

  • सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरसाठी - 3 पदे

याप्रमाणे अर्ज करा

इच्छुक उमेदवार रिक्त जागा आणि पात्रतेनुसार त्यांच्या पसंतीच्या हवाई दल स्टेशनवर ऑफलाइन मोडद्वारे अर्ज सादर करू शकतात. अधिसूचनेमध्ये दिलेल्या फॉर्मेटमध्ये भरलेल्या कागदपत्रांसह अर्ज कॉमन पोस्ट/ नोंदणीकृत पोस्ट/ स्पीड पोस्ट/ कुरिअरद्वारे संबंधित हवाई दल स्टेशनला सादर करावा लागेल.

पात्रता

-या रिक्त जागेत वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये-

-अधीक्षक पदासाठी- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

-लोअर डिव्हिजन लिपिक पदासाठी- मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी.

-स्टोअर कीपर पदासाठी- बारावी किंवा समकक्ष.

-कुक (सामान्य ग्रेड) पदासाठी- मान्यताप्राप्त मंडळाकडून प्रमाणपत्रासह मॅट्रिक्युलेशन किंवा कॅटरिंगमध्ये डिप्लोमा.

-पेंटर, सुतार, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, ए/सी मेक, फिटर, हाऊस कीपिंग स्टाफ, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, ट्रेड्समॅन - मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास.

-हिंदी टंकलेखक पदासाठी - मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com