Indian Air Force: हवाई दल खरेदी करणार 3 लाख कोटी रुपयांची शस्त्रे, हजारो तरुणांना मिळणार नोकरीची संधी

Indian Air Force: एअर चीफ मार्शल यांनी माहिती दिली की, भारतीय हवाई दलाने रशियाकडून तीन जमिनीवरून हवेत मारा करणारी S-400 क्षेपणास्त्रे मागवली आहेत आणि पुढील वर्षी अशी आणखी दोन क्षेपणास्त्रे मिळणार आहेत.
Indian Air Force|Air Chief Marshal VR Choudhary|Military Equipment
Indian Air Force|Air Chief Marshal VR Choudhary|Military EquipmentDainik Gomantak
Published on
Updated on

Air Chief Marshal VR Choudhary, said that the Air Force will purchase military equipment worth Rs 3 lakh crore in the next seven-eight years:

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी नुकतेच सांगितले की, देशाचे हवाई दल पुढील सात-आठ वर्षांत सुमारे 3 लाख कोटी रुपयांची नवीन लष्करी उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत आहे.

वायुसेना दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित करताना चौधरी म्हणाले की, हवाई दल (Indian Air Force) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) विशेषतः पूर्व लडाखमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

तेजस लढाऊ विमानांची मोठी खरेदी

यावेळी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी ते म्हणाले, 'एलसीएच (हलके लढाऊ हेलिकॉप्टर), एलसीए (हलके लढाऊ विमान) मार्क 1ए, एचपीआर (शक्तिशाली रडार), आणि सीआयडब्ल्यूएस (क्लोज-इन अटॅक वेपन सिस्टम) खरेदीसाठी करार अंतिम टप्प्यात आहे आणि त्याची किंमत सुमारे 1.72 लाख कोटी रुपये आहे.

चौधरी म्हणाले, 'यंदा वार्षिक रोख खर्च सुमारे 41,180 कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षातील कराराबद्दल बोलायचे तर, केवळ देशांतर्गत पातळीवरील खरेदीवर अंदाजे 16,000 कोटी रुपये खर्च केले जातील.

हवाई दलाने (Indian Air Force) 97 तेजस मार्क 1A हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना आखली आहे आणि त्याशिवाय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 40 तेजस मार्क 1 आणि 83 तेजस मार्क IA लढाऊ विमानांच्या खरेदीवर शिक्कामोर्तब केले आहे, असे चौधरी पुढे म्हणाले.

Indian Air Force|Air Chief Marshal VR Choudhary|Military Equipment
Sikkim Cloud Burst: सिक्कीममध्ये ल्होनाक सरोवरावर ढगफुटी; तिस्ता नदीला पूर, 23 जवान बेपत्ता

भू-राजकीय परिस्थितीचा विचार

एका प्रश्नाच्या उत्तरात एअर चीफ मार्शल यांनी माहिती दिली की, भारतीय हवाई दलाने रशियाकडून तीन जमिनीवरून हवेत मारा करणारी S-400 क्षेपणास्त्रे मागवली आहेत आणि पुढील वर्षी अशी आणखी दोन क्षेपणास्त्रे मिळणार आहेत.

भू-राजकीय परिस्थितीत (भारताच्या शेजारी) बरीच अनिश्चितता असल्याचे हवाई दल प्रमुख म्हणाले आणि त्यामुळे मजबूत सैन्याची गरज आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force) परिस्थितीनुसारच या प्रदेशात लष्करी ताकद दाखवेल, असे ते म्हणाले.

Indian Air Force|Air Chief Marshal VR Choudhary|Military Equipment
India-Canada Row: भारताचा कॅनडाला आणखी एक दणका, 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश

रोजगाराच्या संधी

"भारतीय हवाई दल (Indian Air Force) स्वदेशी विमान प्रकल्पांचा जलद विकास आणि कार्यान्वितरण, सतत देखरेख क्षमता, कमी सेन्सर आणि शूट टाइम, लाँग रेंज प्रिसिजन स्ट्राइक आणि मल्टी-डोमेन क्षमतेच्या विकासावर भर देत आहे" याची माहितीही चौधरी यांनी दिली.

ते म्हणाले की, पहिले C-295 मध्यम वाहतूक विमान गेल्या महिन्यात भारतीय वायुसेनेच्या 11 स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट करण्यात आले होते, जे भारताच्या संरक्षण उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

ते म्हणाले की, संपूर्ण प्रकल्पांतर्गत 16 सी-295 विमाने स्पेनमध्ये आणि 40 विमाने भारतात तयार केली जाणार आहेत. यामुळे अंदाजे 42.5 लाख मनुष्यबळाच्या रोजगारला वाव मिळेल आणि अंदाजे 6,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

सात राज्यांमध्ये पसरलेले सुमारे 125 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग 13,400 पेक्षा जास्त भाग, 4,600 उप-असेंबली आणि सात प्रमुख घटक असेंब्ली तयार करण्यात लागतील.

Indian Air Force|Air Chief Marshal VR Choudhary|Military Equipment
iPhone 15 मध्ये बग! ओव्हरहिटिंगच्या समस्येसाठी अ‍ॅपलचे Instagram अन् Uber कडे बोट

भविष्याची तयारी

हवाई दल प्रमुख म्हणाले की, सशस्त्र दलांचे संशोधन आणि विकास (R&D) भविष्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे. ते म्हणाले की संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी इनोव्हेशन (IDEX) आणि MAKE कार्यक्रमामुळे संरक्षण संशोधन आणि विकासासाठी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळाली आहे.

चौधरी म्हणाले की, हवाई दलाने IDEX कार्यक्रमांतर्गत अँटी-यूएएस (मानवरहित हवाई प्रणाली) करारावर स्वाक्षरी करून स्वदेशीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.

ते म्हणाले, 'आम्ही या मार्गावर पुढे जात आहोत आणि नुकतेच स्वॉर्म अनमॅनड म्युनिशन सिस्टीमचे कंत्राट देण्यात आले आहे जे भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) सुरू केलेल्या अत्यंत यशस्वी मेहर बाबा स्वर्म ड्रोन स्पर्धेचे परिणाम आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com