India-Canada Row: भारताचा कॅनडाला आणखी एक दणका, 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश

India-Canada Row: भारताच्या या पलटवारामुळे कॅनडासोबतचे संबंध आता रसातळाला गेले आहेत. भारतातील निज्जर हत्याकांडात जस्टिन ट्रुडो यांनी वारंवार पुरावे मागूनही अद्याप ठोस पुरावे देऊ शकलेले नाहीत.
India in another blow to Canada orders 41 diplomats to leave the country.
India in another blow to Canada orders 41 diplomats to leave the country.Dainik Gomantak
Published on
Updated on

India in another blow to Canada orders 41 diplomats to leave the country: फायनान्शिअल टाईम्सने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने कॅनडाला देशातून राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलवून घेण्यास सांगितले आहे.

कॅनडा सरकारला भारत सरकारने सांगितले आहे की त्यांनी, 10 ऑक्टोबरपर्यंत 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले पाहिजे. या ताज्या घडामोडीबाबत भारत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

खलिस्‍तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्‍जरच्या हत्येबाबत कोणतेही पुरावे नसताना कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो भारताचा यामध्ये हात असल्याचा सातत्याने आरोप करत आहे. आता भारताने ही नवी खेळी खेळत कॅनडावर मोठा पलटवार केला आहे.

कॅनडाचे भारतात सध्या 62 राजनयिक आहेत आणि यातील एकूण 41 अधिकारी कॅनडाने माघारी बोलावले पाहिजेत असे भारताचे म्हणणे असल्याचे फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्रात म्हटले आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केल्याने नवी दिल्ली आणि ओटावा यांच्यातील राजनैतिक संबंध सर्वात खालच्या पातळीवर घसरल्याचे दिसले.

18 जून रोजी कॅनडातील सरे, ब्रिटीश कोलंबिया येथील गुरुद्वाराच्या बाहेर पार्किंगमध्ये निज्जर या दहशतवादीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

India in another blow to Canada orders 41 diplomats to leave the country.
Astrologer in Brazil: मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषाने दिलेले चॉकलेट खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू

कॅनडाने निराश केले- जयशंकर

भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, कॅनडाने सर्वप्रथम भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरुद्ध हिंसाचार आणि धमकावण्याचे प्रकार केले. ते म्हणाले की, कॅनडातील शीख फुटीरतावादी गटांच्या उपस्थितीने भारताला निराश केले आहे.

त्याचवेळी, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या भेटीत हा मुद्दा उपस्थित केला होता.

ब्लिंकेन म्हणाले की, या घटनेमागे जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी कॅनडाने अद्याप कोणतेही सार्वजनिक पुरावे दिलेले नाहीत हे विशेष.

India in another blow to Canada orders 41 diplomats to leave the country.
करचुकवेगिरीचा आरोप; 196 कोटींच्या कर मागणी विरुद्ध Netflix जाणार न्यायालयात

जयशंकर यांनी मागितले पुरावे

भारताच्या या पलटवारामुळे कॅनडासोबतचे संबंध आता रसातळाला गेले आहेत. भारतातील निज्जर हत्याकांडात जस्टिन ट्रुडो यांनी वारंवार पुरावे मागूनही अद्याप ठोस पुरावे देऊ शकलेले नाहीत.

निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असल्याचा दावा यापूर्वी ट्रुडो यांनी केला होता. त्याच्या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा तो अद्याप देऊ शकलेला नाही आणि त्यामुळे तो जगात एकटा पडला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यात कॅनडाचे हे आरोप फेटाळून लावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com