Rashid Khan Marriage: राशिद खान पुन्हा बोहल्यावर? मिस्ट्री वुमनसोबतचा फोटो व्हायरल, पोस्टमधून दिलं 'हे' स्पष्टीकरण!

Rashid Khan Second Marriage: अफगाणिस्तानचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि फिरकीचा जादूगार राशीद खान सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आहे.
Rashid Khan Marriage News
Rashid Khan MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

Rashid Khan Marriage: अफगाणिस्तानचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि फिरकीचा जादूगार राशीद खान सध्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, राशीद एका महिलेसोबत त्याच्या 'खान चॅरिटी फाउंडेशन'च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर लगेच हे फोटो पाहून चाहत्यांमध्ये त्या महिलेच्या ओळखीबद्दल मोठी उत्सुकता आणि तर्कवितर्क सुरु झाले. या अफवा आणि चर्चा वाढत असतानाच अखेर राशीदने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. या पोस्टच्या माध्यमातून त्याने त्या महिलेसोबतच्या नात्याची कबुली दिली.

रशीद खानची दुसरी पत्नी

सोशल मीडियावर (Social Media) सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत राशीदने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत त्याचे दुसरे लग्न झाल्याचे अधिकृतरित्या घोषित केले. राशीदने पोस्टमध्ये म्हटले की, "2 ऑगस्ट 2025 रोजी, मी माझ्या आयुष्यातील एका नवीन आणि महत्त्वाच्या इनिंगला सुरुवात केली. मी लग्न (Marriage) केले. विशेष म्हणजे, मी अशा महिलेशी लग्न केले, जे प्रेम, शांती आणि भागीदारी या माझ्या अपेक्षा पूर्ण करते.'

Rashid Khan Marriage News
Rashid Khan: करामती राशिदचा मोठा 'कारनामा'! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा आशियाई कर्णधार; नेतृत्वासह गोलंदाजीतही चमकला

"मी नुकतेच माझ्या बायकोला चॅरिटी कार्यक्रमासाठी घेऊन गेलो. मात्र एका साध्या गोष्टीवरुन लोकांनी अटकळ बांधल्या, हे दुर्देव आहे. सत्य अगदी स्पष्ट आहे की, ती माझी पत्नी आहे आणि लपवण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही. ज्यांनी प्रेम, समर्थन आणि सहानुभूती दाखवली, त्यांचे आभार," असे राशीदने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि क्रिकेट जगतातील सहकाऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

राशीद खान फाउंडेशनचे कार्य

राशीद खान केवळ क्रिकेटच्या मैदानावरच नाही, तर आपल्या देशातील गरजूंसाठी सामाजिक कार्यही करत आहे. 'खान चॅरिटी फाउंडेशन'च्या माध्यमातून तो महत्त्वाचे योगदान देत आहे. हे चॅरिटी फाउंडेशन प्रामुख्याने शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि अफगाणिस्तानमधील गरजू कुटुंबांना मानवतावादी मदत पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. राशीदच्या या सामाजिक कार्याबद्दल त्याचे खूप कौतुक केले जात आहे.

Rashid Khan Marriage News
Rashid Khan Video: करामती खानची रेकॉर्डब्रेक Hat-Trick! 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

अफगाणिस्तान क्रिकेट संघाची आगामी मालिका

राशीद खानच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याचा देश अफगाणिस्तान आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. अफगाणिस्तानचा संघ जानेवारी 2026 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असेल. टी-20 विश्वचषक 2026 फेब्रुवारीमध्ये भारत आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात 19 जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com