देशाच्या पहिला ट्रान्सजेंडर पायलटचं आकाशात उड्डाण करण्याचं स्वप्न पुर्ण होणार का?

ट्रान्सजेंडर पायलट बनण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, तरीही हॅरीला व्यावसायिक पायलटचा परवाना मिळविण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले
Adam Harry
Adam HarryDAinik Gomantak
Published on
Updated on

Transgender Pilot: अ‍ॅडम हॅरी (Adam Harry), भारताचा पहिला ट्रान्सजेंडर पायलट, मात्र त्याचे विमान उडवण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही याची चिंता आहे! अ‍ॅडम, 23 वर्षाचा आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) म्हटले आहे की, हार्मोनल थेरपी (Female to male therapy) घेत असलेल्या व्यक्तीला विमान उडवण्याचे काम दिले जाऊ शकत नाही.

पुढे DGCA ने असेही म्हटले आहे की, ट्रान्सजेंडर पायलट बनण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, तरीही त्यांनी हॅरीला व्यावसायिक पायलटचा परवाना मिळविण्यासाठी वैद्यकीय चाचणीसाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. हॅरीकडे खाजगी वैमानिकाचा परवाना आहे. पण डीजीसीएचे विधान थोडे गोंधळात टाकणारे आहे कारण त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की 'हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी' घेत असलेल्या व्यक्तीला विमान उडवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

Adam Harry
शिंजो आबेंच्या हत्येनंतर VVIP लोकांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारच्या राज्यांना सूचना

DGCA अधिकाऱ्यांनी हॅरीला हार्मोनल थेरपी थांबवायला सांगितल्यावर हॅरीने प्रशिक्षण शाळेत प्रवेश घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. हॅरी 23 वर्षांचा आहे आणि तो म्हणतो की ट्रान्सजेंडर्सना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी हार्मोनल थेरपी घ्यावी लागते. आणि ती आता थांबवणे शक्य नाही. पण असे असले तरी, परवाना मिळविण्यासाठी मी हार्मोनल थेरपी घेणे थांबवावे अशी भारतातील अधिकाऱ्यांची इच्छा आहे.

हॅरीने राजीव गांधी अकादमी ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. 2019 मध्ये हॅरीने राजीव गांधी अकादमी ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. यामध्ये त्याला राज्य सरकारने मदत केली. परंतु डीजीसीएने त्याला वैद्यकीय तपासणीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. भारतात पायलट होण्यासाठी ट्रान्सजेंडरवर कोणतेही बंधन नाही, असे डीजीसीएने सांगितल्याने मला आनंद होत असल्याचे तो म्हणाला, पण त्याला डीजीसीएकडून मिळालेले उत्तर थोडे गोंधळात टाकणारे आहे.

Adam Harry
Jammu and Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा CRPF तुकडीवर हल्ला, चकमकीत जवान शहीद

हॅरी कोणती लढाई लढत आहे?

हॅरीला पुरूष म्हणून व्यावसायिक पायलट म्हणून भारतात विमान उडवायचे आहे आणि ही त्याची स्वत:ची लढाही आहे. या प्रकरणी केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू म्हणतात की, हॅरी त्रासदायक परिस्थितीचा सामना करत आहे. कारण ट्रान्सजेंडर्सना मदत करण्यासाठी सध्याची व्यवस्था पुरेशी नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com