Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी

Actor Allu Arjun 14 Day Police Custody: पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी कोर्टाने मोठा दणका दिला. कोर्टाने अल्लूला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी
Allu ArjunDainik Gomantak
Published on
Updated on

Actor Allu Arjun Sent To 14 Day Police Custody

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला नामपल्ली कोर्टाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले, जिथे कोर्टाने अल्लूला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

न्यायमूर्ती जुववादी श्रीदेवी यांच्यासमोर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुन मार्फत दाखल केलेल्या रद्दबातल याचिकेवर लंचनंतर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. या याचिकेत अल्लूविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.

संध्या थिएटर प्रकरणी अटक

दरम्यान, ही घटना तेव्हा घडली जेव्हा 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला संध्या थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. लोक अॅडव्हान्स तिकीट काढून चित्रपट बघायला आले होते आणि अल्लू अर्जुनही तिथे येणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण अल्लू अर्जुनच्या टीमने अचानक त्याचा दौरा ठरवला आणि तो थिएटरमध्ये पोहोचताच त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे अल्लू अर्जुन आणि इतरांवर निष्काळजीपणाचे आरोप झाले.

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला अटक; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई!

अल्लू अर्जुनच्या अटकेचा विरोधकांनी निषेध केला

दुसरीकडे, अल्लू अर्जुनच्या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष केटीआर म्हणाले की, अल्लू अर्जुनबाबत सरकारचा (Government) दृष्टिकोन योग्य नाही. अल्लू अर्जुनला सामान्य गुन्हेगार समजणे योग्य नाही. अल्लूच्या अटकेसाठी केंद्रीय मंत्री बंदी संजय यांनी सरकारला जबाबदार धरले. चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. चेंगराचेंगरीसाठी त्यांनी सरकारच्या अपयशाला जबाबदार धरले.

Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी
Allu Arjun: अल्लू अर्जुनचा जेलमधील मुक्काम वाढणार का? सायंकाळी होणार सुनावणी

एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात

अल्लू अर्जुनने संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात याचिका दाखल करुन पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर (FIR) त्वरीत सुनावणीची आणि रद्द करण्याची मागणी केली आहे. अल्लू अर्जुनची याचिका न्यायालयाने मान्य केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com