'जय श्री राम'चा नारा देणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेजवरुन हाकलनं शिक्षिकेला पडलं महागात, कॉलेजने केली कारवाई

Jai Shree Ram Slogan Controversy: गाझियाबादमधील एका खासगी महाविद्यालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Jai Shree Ram Slogan Controversy
Jai Shree Ram Slogan ControversyDainik Gomantak

Jai Shree Ram Slogan Controversy: गाझियाबादमधील एका खासगी महाविद्यालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी स्टेजवरुन 'जय श्री राम'चा नारा देताना दिसत होता.

जेव्हा विद्यार्थ्याने स्टेजवरुन 'जय श्री राम' म्हटले तेव्हा एका महिला शिक्षिकेने त्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगितले होते. आता याप्रकरणी महाविद्यालयाने कडक कारवाई केली आहे. महाविद्यालयाने महिला शिक्षिकेला निलंबित केले आहे. याशिवाय, यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयाच्या संचालकाने व्हिडिओ जारी केला होता

दरम्यान, ABES महालिद्यालय गाझियाबादचे संचालक संजय कुमार सिंह यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की, 'काल एक व्हिडिओ माझ्या लक्षात आला होता. तो व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली.

या समितीला 24 तासांच्या आत शिफारशी देण्याच्या सूचना महाविद्यालय (College) प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. समितीच्या शिफारशींच्या आधारे दोन प्राध्यापकांचे वर्तन अयोग्य असल्याचे आढळून आल्याने त्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे.'

Jai Shree Ram Slogan Controversy
Viral Video: विद्यार्थ्याने दिला ‘जय श्री राम’चा नारा, महिला शिक्षिकेने गेट आऊट म्हणत...

काय आहे संपूर्ण प्रकरण?

शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ गाझियाबादच्या एबीईएस महाविद्यालयाचा आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने स्टेजवरुन 'जय श्री राम'चा नारा दिला.

विद्यार्थ्याने (Student) हे कृत्य केल्यावर एक महिला शिक्षिका तात्काळ उठून स्टेजजवळ गेली आणि त्याला असे करण्यापासून रोखले. ही घोषणाबाजी करण्याची जागा नाही, असं शिक्षिका म्हणाला. यानंतर तिने विद्यार्थ्याला ‘गेट आउट’ म्हणत स्टेजवरुन खाली उतरवले होते.

Jai Shree Ram Slogan Controversy
BBC Documentary वरुन डीयूमध्ये गोंधळ, 'जय श्री राम' अन् 'आझादी'च्या घोषणांनी...!

पोलिसांच्या कारवाईनंतर महाविद्यालयाची कारवाई

दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये शिक्षिकेने स्टेजवरुन घोषणाबाजी करण्यात काहीच अर्थ नसल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावर अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली होती.

गाझियाबाद पोलीस आयुक्तालयाने ट्विटरवर लिहिले की, "स्टेशन प्रभारी क्रॉसिंग रिपब्लिक यांना चौकशी करुन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत." आता याप्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com