BBC Documentary वरुन डीयूमध्ये गोंधळ, 'जय श्री राम' अन् 'आझादी'च्या घोषणांनी...!

Delhi University: बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद आता देशातील अनेक विद्यापीठांमध्येही रंगू लागला आहे.
Delhi University
Delhi UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

BBC Documentary: बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद आता देशातील अनेक विद्यापीठांमध्येही रंगू लागला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या डॉक्युमेंट्रीचे स्क्रिनिंग आयोजित केले होते.

मात्र, कॅम्पसमधील वीज खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर डॉक्युमेंटरी पाहताना 'आझादी'चा नारा दिला. त्याचवेळी, डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात इतर विद्यार्थ्यांनीही 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.

QR कोडसह माहितीपट शेअर केला आहे

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आज दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) आंबेडकर कॉलेजमध्ये बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर कॅम्पसमधील वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर लेफ्ट विंग स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (SFI) च्या विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनवर डॉक्युमेंट्री पाहण्यास सुरुवात केली. सर्व विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनवर ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी QR कोड दिले आहेत.

Delhi University
BBC Documentary On Modi: बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत अमेरिकेने बदलली भूमिका; आधी भारताचे केले होते कौतूक...

दिल्ली पोलीस गेटवर तैनात

बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीच्या प्रदर्शनापूर्वी आंबेडकर कॉलेज प्रशासनाने निर्मल गेटला कुलूप लावले होते. कॉलेजचे सुरक्षा कर्मचारी गेटवर तैनात करण्यात आले. आयकार्ड दाखवल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे कर्मचारीही कॉलेजच्या गेटवर तैनात करण्यात आले आहेत. या गोंधळात आंबेडकर महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर डॉक्युमेंटरी पाहिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकार आणि पोलिसांच्या (Police) विरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी, दिल्ली विद्यापीठाच्या कला विद्याशाखेतील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमुळे वाद वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.

Delhi University
BBC Documentary: जेएनयूनंतर जामियामध्येही बीबीसी डॉक्युमेंटरीवरुन गोंधळ!

'आझादी' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा

दिल्ली विद्यापीठाच्या आंबेडकर कॉलेजमध्ये 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवेळी 'आझादी' आणि 'जय श्री राम'च्या घोषणाही देण्यात आल्या. कॅम्पसमधील वीज खंडित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मार्टफोनवर डॉक्युमेंटरी पाहण्यास सुरुवात केली. डॉक्युमेंट्री पाहताना विद्यार्थ्यांनी 'आझादी'च्या घोषणा दिल्या. त्याचवेळी डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधात इतर विद्यार्थ्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

Delhi University
BBC डॉक्युमेंटरीवरुन JNU-जामियानंतर पंजाब विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक; जाणून घ्या दिवसभरात काय घडलं

जेएनयू आणि जामियामध्येही गोंधळ

बीबीसीच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवरुन जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामियामध्ये गदारोळ झाला होता. मंगळवारी रात्री जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. दगडफेकीच्या बातम्याही आल्या. त्याचवेळी, जामियामध्ये डॉक्युमेंटरी स्क्रीनिंगमुळे 13 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com