निलंबनाचा दंडुका! AAP MP संजय सिंह निलंबित, आतापर्यंत 24 खासदार निलंबित

Monsoon Sessions: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याबद्दल 19 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले.
AAP MP Sanjay Singh
AAP MP Sanjay SinghDainik Gomantak

Monsoon Sessions of Parliament: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या वेलमध्ये घुसून घोषणाबाजी केल्याबद्दल 19 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. आता राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेतून 20 आणि लोकसभेतून 4 खासदारांना आतापर्यंत एकूण 24 खासदार निलंबित करण्यात आले आहेत. संजय सिंह यांना राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, निलंबित खासदारांमध्ये सुश्मिता देब, डॉ. शंतनू सेन, डोला सेन, मौसम नूर, शांता छेत्री, नदीमुल हक, अभिरंजन बिस्वास (सर्व तृणमूल काँग्रेस), हमीद अब्दुल्ला, आर. गिरिरंजन, एनआर एलंगो, एम. षणमुगम, एस. कल्याणसुंदरम (सर्व तृणमूल काँग्रेस) यांचा समावेश आहे. आणि कनिमोझी (द्रमुक), बी.एल. यादव, दामोदर राव दिवाकोंडा आणि रविहंद्र वेदीराजू (सर्व टीआरएस), ए.ए. रहीम आणि व्ही. शिवदासन (दोन्ही सीपीआय-एम) आणि संतोष कुमार (सीपीआय).

AAP MP Sanjay Singh
सोनिया गांधींना ED ने उद्या पुन्हा बोलावले, 6 तास झाली चौकशी

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले, "खासदारांच्या निलंबनाचा निर्णय जड अंत:करणाने घेण्यात आला आहे. ते अध्यक्षांच्या आवाहनाकडे सतत दुर्लक्ष करत होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) कोरोना संसर्गातून बरे होऊन संसदेत परतल्यानंतर सरकार चर्चा करेल."

ते पुढे म्हणाले की, 'जे सदस्य कामकाजात भाग घेत नाहीत, त्यांना निलंबित करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला आहे. आम्हाला इथे स्पष्ट करायचे आहे की, इतर देशांच्या तुलनेत भारतात महागाई कमी आहे. विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत.'

AAP MP Sanjay Singh
National Herald Case: सोनिया गांधींना ED ने बजावले समन्स, '21 जुलै रोजी हजर राहा'

त्याचबरोबर, खासदारांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) वतीने सांगण्यात आले आहे की, 'तुम्ही आमचे निलंबन करु शकता पण तुम्ही आम्हाला गप्प करु शकत नाही. दयनीय परिस्थिती... आमचे खासदार लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांना निलंबित केले जात आहे. हे किती दिवस चालणार? संसदेचे पावित्र्य धोक्यात आले आहे.'

शिवाय, लोकसभेतील गदारोळामुळे सभापती ओम बिर्ला यांनी काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित केल्यानंतर ही कारवाई झाली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. हरिदास यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com