Aadhaar-PF Seeding, GST, LPG pricesमध्ये 1 सप्टेंबरपासून होणार बदल

या बदलांमुळे निश्चितपणे सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे.
Aadhaar-PF Seeding, GST, LPG prices increase
Aadhaar-PF Seeding, GST, LPG prices increaseDainik Gomantak

येत्या सप्टेंबर महिन्यात (September) काही राज्यांमध्ये कोविड-19 (Covid-19) ची प्रकरणे वाढत असताना, दैनंदिन जिवनातील वस्तूंबाबतही काही बदल होणार आहेत. या बदलांमध्ये (Aadhaar) आधार-पॅनकार्ड (Pancard) लिंकिंग आणि एलपीजी (LPG) स्वयंपाकाचा गॅसच्या किंमतींमध्ये अपेक्षित वाढ होणे या गोष्टींचा समावेश आहे. या बदलांमुळे निश्चितपणे सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

1 सप्टेंबरपासून हे बदल निश्चित

  • पॅन-आधार लिंक करणे

भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांनी 30 सप्टेंबर पर्यंत त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) आधार नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेळेत हे केले नाही तर SBI ग्राहकांचे विशिष्ट व्यवहार बंद होण्याची शक्यता आहे. एका दिवसांत 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढण्यास किंवा जमा करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या वेबसाइटवर आपले आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे.

Aadhaar-PF Seeding, GST, LPG prices increase
पाकिस्तानची भारताविरुद्ध पुन्हा नापाक हरकत, लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर
  • एलपीजी गॅसच्या किंमती वाढणार

एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती सप्टेंबर महिन्यात वाढणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी एलपीजीच्या किंमतीत प्रति सिलिंडर 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर जुलैमध्ये त्यात 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. म्हणून या दोन महिन्याच्या किंमती लक्षात घेता सप्टेंबर महिन्यात LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • आधार-पीएफ लिंकिंग गरजेचं

सप्टेंबर महिन्यापासून, जर तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचा नियोक्ता तुमच्या भविष्य निधी (PF) खात्यात कोणतेही पैसे जमा करू शकणार नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) सामाजिक सुरक्षा संहिता 2020 च्या कलम 142 मध्ये सुधारणा केली होती.

  • GSTR-1 फाइलिंग मार्गदर्शक तत्त्वे

सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ने म्हटले आहे की जीएसटीआर -1 भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी नियमांनुसार नियम -59 (6) लागू होईल. या नियमानुसार, जीएसटीआर -3 बी फॉर्ममध्ये रिटर्न दाखल न केलेल्या कोणत्याही नोंदणीकृत व्यक्तीला जीएसटीआर -1 फॉर्म भरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Aadhaar-PF Seeding, GST, LPG prices increase
COVID19: केरळमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत होऊ शकते कोरोनाची स्थिती स्थिर
  • क्लिअरन्स चेक करा

फसवणुकीच्या कृत्याला आळा घालणे रिझर्व्ह बँकेच्या पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा उद्देश आहे. त्याचबरोबर जारीकर्त्याच्या तपशीलांची पडताळणी करण्यासाठी चेक क्लिअर करणे हा या सिस्टीमचा उद्देश होता. ही कार्यप्रणाली 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली होती. अनेक बँकांनी आधीच ही नवीन प्रणाली स्वीकारली आहे. आता Axis बँक ही 1 सप्टेंबरपासून ही नवीन प्रणाली स्वीकारणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com