भारतीय सुरक्षा दलांनी (Indian Army) पाकिस्तानचा (Pakistan) आणखी एक कट उधळून लावला आहे. जम्मू -काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पूंछमध्ये (Poonch) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारा दहशतवादी (Terrorists) सुरक्षा दलांनी ठार केला आहे. हा दहशतवादी आज पहाटे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. दहशतवाद्याला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याने गोळीबार सुरू केला.(Jammu-Kashmir: Security forces have foiled terrorist activity in Poonch)
यानंतर प्रत्युत्तरात दहशतवादी ठार झाला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धबंदी करारानंतर नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा हा पहिला प्रयत्न होता.
सध्या या भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. या ठार झालेल्या दहशतवाद्यासोबत दुसरा कोणीही दहशतवादी नव्हता याची पुष्टी सैन्याला करायची आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एके -47 रायफलही जप्त करण्यात आली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कालच एका कार्यक्रमात पाकिस्तानला त्याच्या नापाक कृत्यांबद्दल इशारा दिला होता. यासोबतच त्यांनी भारताच्या शूर सैनिकांनाही प्रोत्साहन दिले होते. यावेळी बोलताना , "भारत स्वतंत्र झाल्यापासून, अनेक भारतविरोधी शक्तींनी भारतामध्ये, सीमेवर किंवा सीमेद्वारे अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या भूमीतून यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले आहेत.
"आज भारत केवळ देशाच्या सीमेत आतंकवादाविरोधात कारवाई करत नाही, तसेच गरज पडल्यास सीमा ओलांडून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्याचे काम आमच्या सैन्याच्या शूर सैनिकांनी केले आहे."असे सांगत त्यांनी सैन्याचे कौतुकही केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.