Bicholim News : भंगारातील दुचाकी चक्क ‘नो पार्किंग’ क्षेत्रात! वाहतुकीला अडसर

Bicholim News : डिचोली बसस्थानकाजवळील प्रकार; प्रवाशांत संताप
Bicholim
Bicholim Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली शहरातील पार्किंग समस्या नित्याचीच बनली असून, बाजारासह विविध ठिकाणी बेशिस्तपणे वाहने पार्किंग करण्याचे प्रकार वाढले आहेत.

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजत आहेत. बऱ्याचदा वाहतूक कोंडीचे प्रकारही अनुभवायला मिळतात. बेशिस्त पार्किंगचे प्रकार घडत असतानाच काही ठिकाणी भंगारातील वाहने बेवारसपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. ही बेवारस वाहने हटवावीत,अशी मागणी होत आहे.

कदंब बसस्थानक परिसरात उभ्या केल्या गेलेल्या या दुचाकींजवळ अन्य सुस्थितीतील दुचाकीही पार्क करुन ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत.

या बेशिस्त पार्किंगमुळे बसस्थानकाबाहेर बऱ्याचदा वाहतूक समस्या निर्माण होत असते. या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष जात नसल्याबद्दल वाहनचालक तसेच प्रवासी आश्चर्य व्यक्त करतात. या बेशिस्त पार्किंग विरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भंगार वाहने हटवा ! शहरातील कदंब बसस्थानकाजवळ तर चक्क ‘नो पार्किंग’ क्षेत्रात भंगार अवस्थेतील दुचाकी बेवारसपणे उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. बसस्थानकाबाहेरील बाजाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच हे चित्र पहावयाला मिळत आहे.

गेल्या कित्येक महिन्यापासून ''नो पार्किंग'' क्षेत्रात या दुचाकी बेवारसपणे उभ्या आहेत. ही वाहने तातडीने हटवा ,अशी मागणी होत आहे.

Bicholim
Goa Sea Food Festival: मिरामार येथे भव्य सीफूड फेस्टिव्हलचे आयोजन, जाणून घ्या वेळ आणि तारखा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com