पालकांनो व्हा सावध ! 3 वर्षांच्या चिमुकल्याने Pop-Up फटाका गिळाल्याने गमावला जीव

गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) जिल्ह्यात अशीच मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.
Surat
SuratDainik Gomantak
Published on
Updated on

देशभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळीत आई-वडील आपल्या पाल्यांना विविध प्रकारचे फटाकेही आणून देतात. एकंदरीत त्यांना आनंदी ठेवण्यासाठी माता पित्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात. परंतु काही पालक लहान मुलांना फटाके फोडण्यासाठी एकटेच सोडतात. आणि त्यानंतर आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील (Gujarat) सुरत (Surat) जिल्ह्यात अशीच मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. सुरतमधील डिंडोलीमध्ये तीन वर्षाच्या मुलाने पॉप-अप (Pop-Up) फटाके खाल्ल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Surat
'भारताकडे वाकड्या नजरेनं बघाल तर Air Strike नक्की', योगींचा तालिबानला इशारा

दरम्यान, त्यानंतर या चिमुकल्याला अतिसार आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. ही घटना समोर येताच या लहानग्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्देवाने तिथे पोहोचताच त्याचा मृत्यू झाला होता. खास करुन दिवाळीमध्ये पालकांना सावध करणाऱ्या या प्रकरणाबाबत बोलताना या चिमुकल्याच्या वडीलांनी सुरतमधील डिंडोली येथे आपल्या तीन वर्षाच्या मुलाच्या आनंदादासाठी फटाके आणून दिले होते. मात्र मुलगा लहान असल्याने फटाके फोडून झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. यानंतर या लहानग्याने थेट फटाकाच गिळला. दरम्यान तो आजाराही पडला होता. अतिसार आणि उलट्याचा त्रास सुरु असतानाच पॉप-अप फटाका फुटल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. जिथे डॉक्टरांनीच त्याला मृत म्हणून घोषित केले. या घटनेनंतर डॉक्टरांनी खास करुन दिवाळीमध्ये फटाक्यांपासून आपल्या मुलांना संभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Man Cuts Private Part Temple
Why did Mamata Banerjee lose in Bhawanipur
Ratan Ranjan Mamata Banerjee Mimicry
Maharashtra Gujarat Day 2026 New York:
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com